Kolhapur Crime | धक्कादायक ! शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून महाविद्यालयीन तरूणीची आत्महत्या

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Kolhapur Crime | शिक्षकाच्या (Teacher) त्रासाला कंटाळून महाविद्यालयीन तरूणीने आत्महत्या (Suicide in Kolhapur) केल्याची धक्कादायक घटना (Kolhapur Crime) उघडकीस आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षकाने लग्न करण्याचा तगादा लावल्याने त्याच्या त्रासाला कंटाळून 6 दिवसांपूर्वी विष (Poison) प्राशन केले होते. उपचार सुरु असताना तिचा शुक्रवारी मृत्यू (Died) झाला आहे. ही घटना कागल तालुक्यातील अर्जुनवाडा (Arjunawada) येथे घडली. आकांक्षा तानाजी सातवेकर (Akanksha Tanaji Satvekar) (वय 19) असं मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी मुरगूड पोलिसांनी (Murgud Police) संशयित आरोपी अमित भीमराव कुंभार (Amit Bhimrao Kumbhar) या शिक्षकाला अटक (Arrested) केली आहे.

याबाबत माहिती अशी की, अमित कुंभार (रा. अर्जुनवाडा) हा कागल तालुक्यातील मुगळी येथील एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तो आकांक्षा हिला फोन करून तर कधी सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत त्रास देत होता. मागील महिना दीड महिन्यापासून तो वेगवेगळे संदेश ही पाठवायचा. लग्नासाठी होकार दिला तर मी माझी बायको मुलांना सोडून तुझ्या सोबत विवाह करण्यास तयार होईन, असं म्हणत मेसेज पाठवत होता. (Kolhapur Crime)

दरम्यान, अशा सततच्या त्रासाला कंटाळून आकांशाने (22 जानेवारी) रोजी आपल्या राहत्या घरीच विष प्राशन केले. त्यानंतर तिला उपचारासाठी कोल्हापूर (Kolhapur News) येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारा दरम्यान तिचा मृत्यू (Died) झाला आहे. अमित कुंभार यांच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन केल्याचा जबाब तिने पोलिसांना दिला आहे.

Web Title : Kolhapur Crime | young woman commits suicide due to teachers harassment in arjunwada taluka kagal kolhapur 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे,
पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या

 

TET Exam Scam | खळबळजनक ! राज्यात 7880 बोगस शिक्षक, 7880 अपात्र परीक्षार्थींना गुण वाढवून केले पात्र; पुणे पोलिसांच्या तपासात खळबळजनक खुलासा (व्हिडीओ)

Ankita Lokhande Bold Scene | अंकिता लोखंडेनं लग्नानंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! म्हणाली – ‘नो टू..’

Bank Holidays in Feb 2022 | फेब्रुवारी महिन्यात 12 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी आवश्य पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Bhaiyyu Maharaj Suicide Case | भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक दोषी; जाणून घ्या प्रत्येकाचा ‘रोल’