Kolhapur News | जीव वाचवण्यासाठी रुग्णालयात गेला अन् तिथेच स्वतःच्या आयुष्याचा केला शेवट; कोल्हापूरमधील घटना

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – Kolhapur News | कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या लक्ष्मीपूरीमध्ये हि धक्कदायक घटना घडली आहे. या ठिकाणी असलेल्या सूर्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णाने हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना आज पहाटेच्या सुमारास घडली आहे. जयसिंग ज्ञानदेव कणसे असे मृत आत्महत्या करणाऱ्या रुग्णाचे नाव आहे. ते 48 वर्षांचे होते. ते करवीर तालुक्यातील शिरोली पुलाची गावचे रहिवाशी होते. (Kolhapur News)

काय घडले नेमके?

कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी इथं असणाऱ्या सूर्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांने हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. त्यांना काल दुपारी सूर्या हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांनी हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून आपल्या आयुष्याचा शेवट केला. डोक्याला वर्मी मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हॉस्पिटल प्रशासनाने याची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना दिली असून जयसिंग ज्ञानदेव कणसे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आला आहे. (Kolhapur News)

काही दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यात देखील अशीच एक घटना घडली होती. यामध्ये शहरातील झारीबाग परिसरात पाचव्या मजल्यावरून पडून चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. यष्वी दीनेश देशमाने असे मृत पावलेल्या चिमुकलीचे नाव आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिरज शहरातील झारीबाग परिसरातील बुधगावकर मळा या ठिकाणी हि घटना घडली आहे.

Web Title :- Kolhapur News | kolhapur surya hospital he went to the hospital and ended his life incident in kolhapur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Kasba Peth Bypoll Election | भाजपाच्या प्रचाराचे लोण शोळेपर्यंत ! पालकांकडून संताप व्यक्त

Amruta Khanvilkar | केवळ चार शब्दातच अभिनेत्री अमृता खानविलकरने केले ट्रॉलर्सचे तोंड बंद; व्हिडिओ व्हायरल

Saumya Tandon | ‘भाभीजी घरपर है’ फेम अभिनेत्री सौम्या टंडनने केला एक धक्कादायक खुलासा; म्हणाली…