Maharashtra Rain Update | राज्यात पावसाची दमदार बॅटिंग; कोकण, विदर्भात मुसळधार, तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Rain Update | गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक भागात पावसाने (Maharashtra Rain Update) थैमान घातले आहे. पश्चिम महाराष्ट्रापेक्षा (Western Maharashtra) विदर्भात (Vidarbha) यंदा पावसाने चांगलाच जोर पकडला असल्याचे दिसते. हवामान खात्याच्या (Indian Meteorological Department) अंदाजानुसार, कोकणातील (Konkan) रायगडसह (Raigad) रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यांना पुढील पाच दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भातील बहुतांश जिह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विदर्भामध्ये सर्वत्र पुरस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यात (Marathwada) देखील अनेक ठिकाणी पावसाची (Maharashtra Rain Update) रिपरिप दिसून येत आहे. गेल्या काही दिवसापासून पुणे (Pune), मुंबईतही (Mumbai) पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. आजही पुण्यात पहाटेपासून पावसाची रिमझिम सुरू आहे. पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असून जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा निर्माण झाला. धामणी धरण 81.64 टक्के भरले आहे. तर कवडास धरण ओव्हरफ्लो झाला आहे.

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात पावसाची दमदार बॅटिंग सुरूच असल्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यांने वाढ झाली आहे.
पंचगंगा नदी आता इशारा पातळीकडे वाटचाल करत असल्यामुळे जिल्हा प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे. सध्या पंचगंगा नदी 38 फुटांवरून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या आहेत.

वर्ध्यात (Wardha) झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यानाल्यांना पूर आला आहे.
निम्न वर्धा धरणाचे 25 दरवाजे उघडण्यात आले आहे. निम्न वर्धा प्रकल्पातुन पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने वर्धा
आणि यशोदा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात
आला आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यात पुढील 5 दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
जिल्ह्यातील 3 नद्या इशारा पातळीवर वाहत आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Pune Expressway | आडोशी बोगदा, लोणावळ्याजवळ छोटी दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत