Koregaon Bhima Commission | कोरेगाव भीमा चौकशी आयोगाला अहवाल सादर करण्यास 6 महिन्यांची मुदतवाढ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरेगाव भीमा घटनेच्या चौकशीचे काम शासनाने नेमलेल्या कलकत्ता उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखालील आयोग (Koregaon Bhima Commission) करत आहे. या आयोगाला ३१ डिसेंबर पर्यंत मुदत दिली होती. मात्र अद्यापही काही साक्षीदारांच्या चौकशी करणे, उलट तपासणी करणे अशी कामे अपूर्ण आहे. यासाठी आणखी कालावधी जाणार आहे. त्यामुळे आयोगाचे कामकाज पूर्ण करण्यास ३० जून २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे राज्याच्या गृह विभागाचे सहसचिव प्र. ग. देशमुख (P.G. Deshmukh, Joint Secretary, Maharashtra Home Department) यांनी स्पष्ट केले आहे (Koregaon Bhima Commission).

 

चौकशी आयोगाचे वकिल आशिष सातपुते (adv ashish satpute) यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव भीमा चौकशी आयोगाला (Koregaon Bhima Commission) शासन निर्णय संदर्भाधीन क्र. १२ च्या ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली होती. ती मुदत संपत आली आहे. अजूनही काही साक्षीदारांच्या साक्षी नोंदवायच्या आहेत. तसेच उलट तपासण्या घेण्याचे काम बाकी आहे. या कामांसाठी वेळ लागत असल्याने आयोगाने कमीत कमी ६ महिने आणखी मुदतवाढ देण्याची अपेक्षा शासनाकडे केली होती. त्यानुसार आयोगास आणखी मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासनाने (Maharashtra Government) आयोगाला आणखी सहा महिन्यांचा कालावधी दिला आहे.

 

Web Title :- Koregaon Bhima Commission | koregaon bhima commission inquiry extended another six months

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुण्यात साडेसात लाखांच्या कर्जाचे मागितले 22 लाख; येवलेवाडीमध्ये बेकायदा सावकारी करणार्‍या आशिष पाटणेविरूध्द कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा

Aadhaar Card Update | बाळ जन्माला येताच बर्थ सर्टिफिकेटच्या अगोदर मिळेल आधार कार्ड, जाणून घ्या होणार कोणते बदल

Pune Crime | पार्टीसाठी टोळक्याने कोयताचा धाक दाखवून लुटले; सिंहगड रोड पोलिसांकडून 6 सराईत गुन्हेगारांना अटक

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’ रुग्णांमध्ये मोठी वाढ, गेल्या 24 तासात 1410 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 65 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी