पुण्यातील उच्चभू वस्तीतील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कोरेगाव पार्क परिसरातील ओशनिक स्पा येथे मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा कोरेगाव पार्क पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी तेथे छापा टाकून परराज्यातील ४ पिडीत तरुणींची सुटका केली आहे. तर स्पा मालक आणि स्पाच्या मॅनेजरविरोधात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

स्पा मालक धनराज (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही), व मॅनेजर के. हिगबा सायमन(रा. मुंढवा मुळ मणिपूर) यांच्याविरोधात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरेगाव पार्क येथील लिबर्टी सोसाय़टीमध्ये असलेल्या ओशनिक स्पा येथे मसाज सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरु असून स्पा सेंटर मध्ये असलेल्या थेरपीस्ट मुलींकडून मसाजच्या नावाखाली देहविक्री करून घेतली जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मदन बहाद्दरपुरे यांना बातमीदाराकडून मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकला. तेव्हा तेथून ४ राज्यासह परराज्यातील मुलींची सुटका करण्यात आली. तर स्पा चा मालक व मॅनेजर हे त्यांच्याकडून पैशाचे अमिष दाखवून देहविक्री करून घेत असल्याचे समोर आले. त्यामुळे त्या दोघांविरोधात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बहाद्दरपुरे व कर्मचारी यांच्या पथकाने केली.

सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

You might also like