जेजुरी : ‘होम टू होम’ तपासणीमध्ये कोथळे व भोसलेवाडी येथे 2461 नागरिकांची तपासणी

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन – पुरंदर तालुक्यात कोरोना संसर्गाचा वाढता प्रभाव लक्षात घेता पुरंदर तालुका प्रशासनाच्या वतीने होम टू होम तपासणी मोहीम हाती घेतली असून कोथळे व भोसले वाडी येथे 2461 नागरिकांची तपासणी करण्यात आली. यावेळी 12 रुग्ण संशयित आढळून आले, या सर्वांचा अँटीजेन टेस्ट रिपोर्ट हा निगेटिव्ह आला असल्याचे पुरंदर तालुक्याच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी सांगितले.

मंगळवार दि 15 रोजी पुरंदर तालुक्यातील कोथळे व भोसलेवाडी येथे होम टू होम सर्व्हेक्षण मोहीम राबविण्यात आली. कोथळे येथे 1433 नागरिकांची तर भोसलेवाडी येथील 1028 नागरिकांची थर्मल स्कँनरने तापमान व ऑक्सिमीटरने रक्तातील ऑक्सिजन चे प्रमाण तपासण्यात आले. दोन्ही गावातील 12 संशयित नागरिकांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली. या बाराही नागरिकांचे रिपार्ट हे निगेटिव्ह आले आहेत.

तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी होम टू होम सर्व्हेक्षणाची पाहणी केली तसेच कर्मचारी वर्गांला मार्गदर्शन केले. यावेळी गटविकास अधिकारी मिलिंद टोनपे, उपधिकारी मिलिंद मोरे, गटशिक्षणाधिकारी पी एस मेमाणे तसेच पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य दत्तात्रय झूरंगे,पंचायत समिती सदस्या सुनीता कोलते, सरपंच शहाजी जगताप उपसरपंच वंदना जगताप, अभिजित जगताप, दक्षता समितीचे दत्ताआबा भोईटे उपस्थित होते .

विस्तार अधिकारी एम एम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य अधिकारी डॉ उज्वला जाधव,बेलसर आरोग्य केंद्राचे डॉ भारतकुमार शितोळे, ग्रामसेवक रवींद्र पिसेआरोग्य सेवक, सेविका शिक्षक, आशा वर्कर सयंसेवक आदींनी सकाळी आठ ते सायंकाळी 6 वाजे पर्यन्त ही मोहीम पूर्ण केली. सरपंच शहाजी जगताप, सरपंच राजेंद्र भोसले यांनी सर्वांचे आभार मानले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like