बहिण कृष्णाच्या ‘बोल्ड’ बिकिनी व्हिडीओवर भाऊ टायगर श्रॉफनं केली ‘अशी’ कमेंट ! म्हणाला…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार जॅकी श्रॉफ (Jackie Shroff)ची मुलगी आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) ची बहिण कृष्णा श्रॉफ (Krishna Shroff) आपल्या बोल्ड लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. कुटुंबात वडिल आणि भाऊ अ‍ॅक्टर असूनही कृष्णा सिल्वहर स्क्रिनपासून दूर आहे. असं असली तरी सोशल मीडियावर मात्र ती नेहमीच अॅक्टीव आणि चर्चेत असते. सोशलवरील तिची फॅन फॉलोविंग एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही. तिचा बॉयफ्रेंड इबान हॅम्स (Eban Hyams) याच्यासोबत ती अनेकदा रोमँटीक फोटो शेअर असते ज्यामुळं ती कायम चर्चेचा हिस्सा बनत असते. याशिवाय आपल्या बोल्ड अवतारासाठीही ती सोशलवर फेमस आहे. अलीकडेच तिनं सोशलवर एक बोल्ड व्हिडीओ शेअर केला आहे. चाहत्यांना तिनं विचारलं आहे की, ती लठ्ठ वाटत आहे का. यावर आता तिचा भाऊ टायगर श्रॉफ यानं कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे.

कृष्णानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती खूप बोल्ड अवतारात दिसत आहे. तिनं रेड कलरची बिकिनी घातली आहे. हातात ड्रिंक घेऊन ती पोज देताना दिसत आहे. कॅप्शन मध्ये तिनं लिहिलं की, लाल रंगात मी जास्त लठ्ठ दिसते का ?

या व्हिडीओत कृष्णा खूपच हॉट दिसत आहे. तिचा हा अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी लाईक्स आणि कमेंट करत तिचं कौतक करत आहे.

इतरांप्रमाणे टायगरनंही यावर कमेंट केली आहे. टायगर म्हणाला की, खूप लठ्ठ दिसत आहे. अनेक कमेंटमधून टायगरच्या या कमेंटनं साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. याशिवाय दिशा पाटनी हिनंही यावर कमेंट करत हॉट असं लिहिलं आहे. याशिवाय इतरही अनेक सेलब्रिटींनी यावर कमेंट केली आहे.

You might also like