#Video : सेक्सी अंदाजात व्हायरल होत आहे, कृति सेननचे ‘हे’ Photo आणि Video…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कृति सेनन लवकरच अभिनेता अक्षय कुमारचा चित्रपट हाऊसफुल ४ मध्ये दिसून येणार आहे. त्याच बरोबरच कृतिचे अनेक बोल्ड अंदाजातील फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये कृति सेनन खूपच सेक्सी अंदाजात दिसत आहे. तिचे फोटो चाहत्यांना खुप पसंतीस पडत आहे. या फोटोवर चाहत्यांनी लाखो मेसेज आणि कमेंट केल्या आहेत. त्याचबरोबर कृतिने शेअर केलेल्या व्हिडिओला देखील चाहत्यांना पसंत केले आहे.

कृतिचा हाऊसफुल ४ चित्रपट २६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. याचबरोबर कृति नेहमी सोशल मिडियावर अ‍ॅक्टिव्ह असते. ती नेहमी सोशल मिडियावर सेक्सी आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. तिने नुकताच सोशल मिडियावर फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती खुप स्टाईल अंदाजात दिसत आहे. तिच्या फोटोंचे कौतुक करुन चाहते थकत नाही. तिच्या प्रत्येक फोटोचे चाहते दिवाने आहे. याआधी कृतिचे अनेक फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे.

कृतिचे सोशल मिडियावर २१ मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहे. ती नेहमी सोशल मिडियावर काहीनकाहीतरी शेअर करत असते. सध्या कृति हाऊसफुल ४ चित्रपटाबरोबरच आणखी काही चित्रपटांच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात २०१४ मध्ये तेलगु चित्रपट नेनोक्कडी मधून केली होती. त्यानंतर तिने अभिनेता टायगर श्रॉफच्या हीरोपंती चित्रपटातून पदार्पण केले होते. त्याचबरोबर अनेक सुपरहिट चित्रपटात तिने काम केले आहे.