दीपिका आणि प्रियांकानंतर आता ‘ही’ अभिनेत्री साकारणार मराठमोळी भूमिका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री कृती सेनन हिने तिचा आगामी सिनेमा पानीपतमध्ये मराठमोळी भूमिका साकारल्याचे पाहायला मिळणार आहे. दीपिका आणि प्रियांकाला मराठमोळ्या लुकचा अनुभव याआधी मिळाला आहे. परंतु कृती सेननने मात्र ऐतिहासिक सिनेमात काम केले नव्हते. त्यामुळे तिच्यासाठी हे वेगळे आव्हान होते. मराठमोळ्या आणि उत्तर भारतीय भूमिकेची तयारी करणे माझ्यासाठी अवघडे होते असेही कृतीने म्हटले आहे.

पानीपत हा सिनेमा तिसऱ्या महायुद्धामागील गोष्टीवर आधारीत आहे. या कृती सेननला सदाशिव भाऊंची दुसरी पत्नी पार्वतीबाईची भूमिका साकारायची आहे. सदाशिव भाऊ पेशवे हे पानीपतच्या तिसऱ्या युद्धावेळी मराठ्यांचे सेनापती होते. मराठमोळा रोल साकारण्याचे एक वेगळे आव्हान कृतीसमोर होते. परंतु दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरने कृतीची चांगली तयारी करून घेतली. तिच्या बोलण्यातले मराठी साधर्म्य असलेले उच्चार, कपड्यांची ठेवण, वागणे, बोलणे सर्व काही त्याने तिला शिकवले.

पानीपतच्या रणसंग्रामावर आधारीत नाटक, कादंबरी प्रेक्षकांनी पाहिली आहे. परंतु सिनेमा आणि त्यातही तो हिंदीत बनवण्याचे धाडस आतापर्यंत कोणत्याच दिग्दर्शकाने केले नव्हते. परंतु आशुतोष गोवारीकरने हे धाडस केले आहे. आशुतोष गोवारीकरने जोधा अकबर, मोहेंजोदडो आणि लगान यांसारख्या ऐतिहासिक सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे.