सावधान ! चुकूनही डाऊनलोड करू नका ‘हे’ अ‍ॅप, KYC च्या नावावर लोकांचे बँक अकाऊंट रिकामे होतायत, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सायबर फ्रॉडच्या घटना कायमच कानावर येतात. आता या फसवणूकीच्या धंद्यात एका नव्या पद्धतीने लोकांना गंडा घालण्याचा घाट सुरु आहे. आता केवायसीचा बहाणा सांगून ग्राहकांना रिमोट एक्सेस अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. त्यानंतर मोबाइल रिमोटवर घेऊन पैशांचा गंडा घातला जातो. बंगळुरू पोलिसांनी अशी अनेक प्रकरणं उघड केली आहेत. या प्रकरणात मोठी समस्या आहे कारण लोक या बाबत तक्रार देखील करु शकत नाहीत. हे गंडे अत्यंत हुशारीने घालण्यात येतात.

कसा होता फ्रॉड
हा फ्रॉड घडण्यासाठी फक्त तुम्हाला येणारा एक कॉलच खूप आहे. पहिल्यांदा तुम्हाला कॉल केला जातो, त्यात सांगण्यात येते की ते एखाद्या बँकेचे किंवा वॉलटचे कस्टमर केअर बोलत आहेत. तुम्हाला तुमचे केवायसी अपडेट करण्यास सांगण्यात येते. असे न केल्यास तुमचे ट्रांजॅक्शन बंद होईल असे सांगितले जाते.

त्यानंतर तुम्हाला घरबसल्या केवायसी अपडेट करण्यास एक अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगण्यात येते. अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला कॉलरने सांगितल्याप्रमाणे काही परमिशन द्याव्या लागतात. त्यानंतर तुमच्या मोबाइलचा अक्सेस त्या कॉलरकडे जातो. यानंतर केवायसी पूर्ण केल्यानंतर कॉलर सांगतो की तुमच्या बँक खात्यातून 1 रुपया ट्रान्जेशन करुन चेक करा की तुमचा केवायसी पूर्ण झाला अथवा नाही.

जर तुम्ही असे केले तर कॉलर त्या क्षणाला तुमची माहिती चोरतो आणि तुमचे पैसे गायब करतो. या सायबर क्राईमच्या फ्रॉडमध्ये तुम्हाला बोलण्यात फसवून मोबाइल हॅक केला जातो. या फसवेगिरीपासून वाचण्यासाठी एकच उपाय आहे तो म्हणजे स्वत: जागरुक आणि सावध राहा.

या बाबींकडे द्या लक्ष
1) सायबर सुरक्षेच्या मते कोणत्याही अपरिचित कॉलवर बोलू नका, फोनवर गोपनीय माहिती देऊ नका, कारण बँक तुमच्याकडून गोपनीय माहिती मागत नाही.

2) कॉलरवर शंका असेल तर तक्रार करा.

3) तुमच्या सिस्टमवर इंटरनेट सिक्योरिटी सॉफ्टवेअर ठेवा. प्रत्येक अ‍ॅपला स्ट्रॉन्ग पासवर्ड, अंक आणि स्पेशल कॅरेक्टरने तयार करा.

4) तुमचे अ‍ॅप सॉफ्टवेअर अपडेट ठेवा. सोशल मिडियावर नियंत्रण ठेवा. खासगी गोष्टी शेअर करणे टाळा.

Visit : Policenama.com