MLA Madhuri Misal On Maharashtra Budget 2023 | शाश्‍वत, गतीमान विकासाबरोबर सर्व समाजघटकांचे हित साधणारा अर्थसंकल्प – आमदार माधुरी मिसाळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – MLA Madhuri Misal On Maharashtra Budget 2023 | पुण्याच्या शाश्‍वत व गतीमान विकासाबरोबर शहराचे सांस्कृतिक वैभव जपणारा आणि सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक प्रगती करणारा अर्थसंकल्प उपमु‘यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जाहीर केल्याच्या भावना आमदार माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केल्या. या अर्थसंकल्पामुळे गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांच्या विकासाला चालना मिळणार असून, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, इतरमागासवर्गीय, मागासवर्गीय, अल्पसं‘यांक, व्यापारी यांचा हित साधणारा अर्थसंकल्प आहे. (MLA Madhuri Misal On Maharashtra Budget 2023)

मिसाळ म्हणाल्या, पुणे मेट्रोच्या कामाला वेग देण्याबरोबर स्वारगेट-कात्रज आणि
पिंपरी-निगडी मेट्रो या मार्गिकांवर मेट्रो विस्तारणार आहे. मेट्रोअंतर्गत ८ हजार ३१३ कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत.
पुणे रिंगरोड, पुणे-मुंबई मिसिंग लिंकसाठी भरीव निधी देण्यात आला आहे.
नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे, पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुण्यात सर्क्युलर इकॉनॉमी पार्क उभारण्यात येणार आहे. (MLA Madhuri Misal On Maharashtra Budget 2023)

मिसाळ म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षांचे
औचित्य साधून या महोत्सवासाठी ३५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शिवनेरी किल्ल्यावर
शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग‘हालय, शिवकालिन किल्ल्यांचे संवर्धन यासाठी ३०० कोटी रुपये आणि आंबेगाव येथील
शिवाजी महाराज संकल्पना उद्यानासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
राज्याच्या वार्षिक महोत्सव आराखड्यात शिवजन्मोत्सव शिवनेरीचा समावेश करण्यात आला आहे. वढू आणि तुळापूर येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक
आणि पुण्यातील भिडेवाडा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे. जिल्ह्यातील भीमाशंकर,
ज्योतिबा या तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यात येणार आहे.

मिसाळ म्हणाल्या, लेक लाडकी योजनेचा लाभ पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारकांना मिळणार
असून १८ व्या वर्षी मुलीला ७५ हजार रुपये मिळणार आहेत. महिलांना एसटी प्रवासात सरसकट ५० टक्के सूट देण्यात आली आहे.
आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात आली आहे.
शहरी भागात नोकरी करणार्‍या महिलांसाठी ५० वसतीगृहे बांधण्यात येणार असून, पीडीत महिलांसाठी आश्रय, विधी सेवा,
आरोग्य सेवा, समुपदेशन आणि ५० शक्तीसदन निर्माण केली जाणार आहेत.
महिलांना मासीक २५ हजार रुपयांचे उत्पन्न व्यवसाय करमुक्त करण्यात आले आहे.

मिसाळ पुढे म्हणाल्या, पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती पाच पटीने वाढविण्यात आली आहे.
सर्व विद्यार्थ्यांसाठी आठवी पर्यंत मोफत गणवेश आणि शालेय स्तरावर कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
शिक्षणसेवकांना १० हजार रुपयांची मानधनात वाढ केली आहे.
डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्थेला मोठे अनुदान दिले जाणार आहे.
पुण्यात मानसिक अस्वास्थ्य आणि व्यसनाधीनतेची समस्या कमी करण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्र
उभारण्याचे प्रस्तावित आहे. बालेवाडी येथे स्पोर्टस सायन्य सेंटर उभारण्यात येणार आहे.

मिसाळ पुढे म्हणाल्या, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत विमा संरक्षण दीड लाखांहून
पाच लाख रुपये करण्यात येणार असून, राज्यात ७०० स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उभारण्यात येतील.
संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेतील अनुदान एक हजार रुपयांहून दीड हजारांपर्यंत वाढविले जाणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी महापालिका क्षेत्रांत विरंगुळा केंद्र आणि राष्ट्रीय वयोश्री योजनेचा विस्तार केला जाणार आहे.
नवीन महामंडळांची स्थापना करून विविध समाजघटकांसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.
अल्पसं‘याक महिलांसाठी १५ जिल्ह्यात तीन हजार बचत गट स्थापन केले जाणार आहेत.

मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत तीन वर्षांत दहा लाख घरे बांधण्यात येणार असून,
ऑटोरिक्षा चालक-मालक कल्याणकारी महामंडळ स्थापन केले जाणार आहे.
व्यापार्‍यांची दोन लाख रुपयांपर्यंतची थकबाकी पूर्णपणे माफ करण्यात येणार असून,
५० लाख किंवा त्यापेक्षा कमी थकबाकी असणार्‍या व्यापार्‍यांनी २० टक्के
थकबाकी भरल्यास उर्वरित ८० टक्के रक्कम माफ करण्यात येणार असल्याचे मिसाळ यांनी सांगितले.

Web Title : MLA Madhuri Misal On Maharashtra Budget 2023 |
A budget that benefits all sections of society with sustainable, dynamic development – MLA Madhuri Misal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Budget 2023 | महिलांसाठी आनंदाची बातमी! आता महिलांना एसटी प्रवासात सरसकट 50 टक्के सुट; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Ajit Pawar | ‘डीजीआयपीआर’मधील 500 कोटींच्या घोटाळ्याला दाबण्याचा सरकारचा प्रयत्न ;विरोधी पक्षनेते अजित पवारांचा आरोप