Labour Code News | सरकारी कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! वाढलेल्या DA सोबत मिळू शकतात 300 सुट्ट्या !

नवी दिल्ली : Labour Code News | जर तुम्ही केंद्र सरकारचे कर्मचारी (Central Government Employees) आहात तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण, मोदी सरकार कर्मचार्‍यांच्या अर्जित रजा (Earned Leave) वाढवण्याबाबत निर्णय घेऊ शकते. मोदी सरकार 1 ऑक्टोबरपासून लेबर कोडचे नियम लागू करू शकते (Labour Code News). यानंतर कर्मचार्‍यांच्या अर्जित रजा 240 वरून वाढवून 300 होऊ शकतात.

लेबर कोडच्या नियमात बदलावरून कामगार मंत्रालय, लेबर यूनियन आणि उद्योग जगतातील प्रतिनिधींमध्ये कामाचे तास, वार्षिक सुट्ट्या, पेन्शन, पीएफ, टेक होम सॅलरी, रिटायर्मेंट इत्यादीबाबत चर्चा झाली होती, ज्यामध्ये कर्मचार्‍यांच्या अर्जित रजा 240 वरून वाढवून 300 करण्याची मागणी करण्यात आली होती.

1 ऑक्टोबरपासून वाढू शकतात सुट्ट्या

सरकार नवीन लेबर कोडचे नियम 1 एप्रिल 2021 पासून लागू करणार होते परंतु राज्यांची तयारी नसल्याने
आणि कंपन्यांची एचआर पॉलिसी बदलण्यासाठी वेळ दिल्याने ते पुढे ढकलण्यात आले. सरकार लेबर कोडचे
नियम 1 जुलैपासून नोटिफाय करणार होते परंतु राज्यांनी हे नियम लागू करण्यासाठी आणखी वेळ
मागितल्याने ते 1 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आले. आता लेबर मिनिस्ट्री आणि मोदी सरकार लेबर कोडचे
नियम 1 ऑक्टोरपर्यंत नोटिफाय करणार आहे.

संसदने ऑगस्ट 2019 ला तीन लेबर कोड इंडस्ट्रियल रिलेशन, कामाची सुरक्षा, हेल्थ आणि वर्किंग कंडीशन
आणि सोशल सिक्युरिटीशी संबंधीत नियमात बदल केले होते. हे नियम सप्टेंबर 2020 रोजी पास झाले होते. हे
नियम आणि लेबर युनियनच्या मागण्या मान्य झाल्या तर 1 ऑक्टोबरपासून सरकारी कर्मचार्‍यांना 300
अर्जित सुट्ट्या मिळू शकतात.

हे देखील वाचा

Pune Khadakwasla Dam | पर्यटकांना खडकवासल्यापुढे जाण्यास बंदी, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

Super Glue | सापाचे विष बनणार मनुष्यासाठी ‘संजीवनी’! शास्त्रज्ञांनी बनवला ‘सुपर ग्लू’, सतत वाहणारे रक्त सेकंदात करेल बंद

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Labour Code News | labour code rules 7th pay commission central government employees earned leave upto 300 from 1st october

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update