कारमध्ये महिला डॉक्टरचा गळा आवळला, चाकूनं सपासप केले वार, नराधम बनला होता सहकारी डॉक्टर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   यूपीच्या आग्रा येथील सरोजिनी नायडू मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस उत्तीर्ण झालेल्या अल्पवयीन महिला डॉक्टरच्या निर्घृण हत्येचा खुलासा झाला आहे. 7 वर्षांपासून तिच्याशी संबंध असलेल्या तिच्या सहकारी डॉक्टरनेच महिला डॉक्टरची हत्या केली.

आरोपी डॉक्टर विवेक तिवारीने आपल्या कबुलीजबाबात सांगितले की, योगिताशी त्याचे 7 वर्षांपासून संबंध होते. मंगळवारी संध्याकाळी तो योगिताला भेटण्यासाठी जालौनहून आग्रा येथे आला होता. जेव्हा ती त्याच्या कारमध्ये बसली तेव्हा त्यांच्यात जोरात भांडण सुरू झाले. यामुळे संतापात त्याने योगिताचा गळा दाबला. जेव्हा त्याला समजले की तिचा मृत्यू झालेला नाही तर कारमध्ये ठेवलेल्या चाकूने तिच्यावर वार करून तिला ठार केले आणि मृतदेह एका रिकाम्या जागी फेकला.

मंगळवारी महिला डॉक्टरची हत्या झाली होती. बुधवारी सकाळी शहरापासून दूर असलेल्या डौकी भागाच्या परिसरातील बमरौली कटारा येथे रिकाम्या प्लॉटमध्ये महिला डॉक्टरचे मृत शरीर आढळले. पोलिसांनी मृतक तरुणीच्या ओळखीचे प्रयत्न सुरू केले तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांना आढळले की मृत तरुणी दुसरी कुणी नाही तर एसएन मेडिकल कॉलेजची एमबीबीएस पासआउट डॉक्टर योगिता गौतम आहे. डॉक्टर योगिता गौतम दिल्लीच्या रहिवासी होत्या. त्यांचे वडील आणि भाऊ देखील डॉक्टर आहेत. डॉ. योगिता गौतम मंगळवारी रात्री उशिरापासून बेपत्ता होत्या आणि त्यांचा फोन बंद होता. कुटुंबियांचा त्यांच्याशी संपर्क देखील होऊ शकत नव्हता.

सकाळी डॉक्टर योगिता गौतम यांचे वडील आणि भाऊ आग्रा येथे पोहोचले. त्यांनी मुलगी बेपत्ता झाल्याचा गुन्हा आग्रा येथील ठाणे एमएम गेट येथे दाखल केला. त्यांनी आरोप लावला की उरई जालौन मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक तिवारी हा सतत त्यांच्या मुलीला त्रास देत होता. तिला जीवे मारण्याची धमकी देखील देत होता. ही माहिती समजल्यानंतर पोलिसांनी डौकी परिसरातील घटनास्थळाभोवती लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना शोधले आणि डॉ. योगिता गौतम यांच्या मृत्यूशी संबंधित पुरावे पोलिसांच्या समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आरोपी डॉ. विवेक तिवारी यांना ताब्यात घेतले.

या प्रकरणाची माहिती देताना एसएसपी आग्रा बबलू कुमार यांनी सांगितले की मृतक महिला डॉक्टरांच्या डोक्यावर आणि गळ्यावर जखमांच्या खुणा आहेत. पोस्टमार्टम अहवालात असेही समोर आले आहे की मरण्यापूर्वी या महिलेने आपला जीव वाचवण्यासाठी धडपड केली होती. आरोपी डॉक्टर विवेक तिवारीची चौकशी केली गेली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी डॉक्टरविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.