‘कॉन्सर्ट’मध्ये ‘फॅन’सोबत डान्स करत होती लेडी गागा, चक्क स्टेजवरून पडली (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हॉलिवूड गायक आणि अभिनेत्री लेडी गागा जगातील सर्वात लोकप्रिय व्यक्तींपैकी एक आहे. तो एक ग्लोबल आयकॉन असून तिच्या खास स्टाइलसाठी ती ओळखली जाते. ती ज्या ठिकाणी जाते तेथील लोकांचे ध्यान ती आकर्षित करून घेते. त्यामुळे तिचा मेट गाला मधील एक फोटो देखील मोठा लोकप्रिय झाला असून मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील झाला आहे.

https://www.instagram.com/tv/B3v9rNZJLKy/?utm_source=ig_web_copy_link

वेगासमध्ये घडली घटना
मात्र या फोटोनंतर आता लेडी गागा पुन्हा चर्चेत आली असून वेगासमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात तिचा अपघात झाला आहे. या कार्यक्रमात ती आपल्या चाहत्यांसोबत नृत्य करत असताना अचानक घसरून पडली. नृत्य करताना त्या चाहत्याचा पाय घसरल्याने लेडी गागा देखील घसरून पडली. त्यामुळे तिच्या या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.


https://www.instagram.com/p/BdlgsrdA6Vi/?utm_source=ig_web_copy_link



मजबूत महिला आहे लेडी गागा

महत्वाचे म्हणजे लेडी गागा आणि तिच्या चाहत्याला कोणतीही दुखापत झाली नसून दोघेही ठीक आहेत. या घटनेनंतर पुन्हा उठून तिने कार्यक्रमात आपली कला सादर केली. तसेच कोणत्याही परिस्थितीत कार्यक्रम सुरु राहिला पाहिजे असे देखील म्हटले.