‘हा’ आहे लालबागच्या राजाचा यंदाचा ‘देखावा’ (फोटो)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन  – लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होत आहे. अनेक मंडळांचा देखावा तयार झाला आहे. गणेशोत्सवादरम्यान मुंबईचे गणपती विशेष पाहिले जातात. अनेक ठिकाणचे गणपती हे भाविकांचे श्रद्धास्थान आहेत. त्यापैकीच एक म्हणजे मुंबईतील लालबाग येथील गणपती. हा गणपती लालबागचा राजा म्हणून प्रसिद्ध आहे.  या गणपतीच्या दर्शनाला प्रचंड गर्दी असते. कारण नवसाला पावणारा गणपती अशी या गणपतीची ख्याती आहे. याचं पहिलं दर्शन प्रसार माध्यमांसाठी करण्यात आलं. यावेळी माध्यमांनीही लालबागच्या राजाची पहिली झलक दाखवली. यामध्ये या राजाचं लोभस रूप पाहायला मिळालं कारण लालबागच्या राजासाठी यंदा चांद्रयान 2 चा देखावा उभारण्यात आला आहे.

Image result for लालबागच्या राजा

गणेशोत्सवादरम्यान अनेक भाविकांची इच्छा असते लालबागच्या राजाचे दर्शन मिळावे. अनेक जण या राजाच्या दर्शनाचे स्वप्न पाहतात. यासाठी देशभरातून भाविक गर्दी करताना दिसतात. अवघ्या दोन दिवसांत म्हणजेच 2 सप्टेंबर रोजी गणपतीचं घराघरात आगमन होणार आहे. प्रत्येक गणेश भक्त बाप्पांच्या आगमनासाठी आतुर झाला आहे.

Image result for लालबागचा राजा 2019

यंदा चांद्रयान 2 चा देखावा साकारणाऱ्या लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचं हे 86वं वर्षा आहे. सध्या समोर आलेला हा देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. या देखाव्याची पहिली झलक समोर आल्यानंतर सर्वत्र या देखाव्याची चर्चा होताना दिसत आहे.

Related image

Image result for लालबागचा राजा 2019 पहिले दर्शन