TV इंडस्ट्रीच्या टॉप अ‍ॅक्टर्सपैकी एक आहे भाजप नेते लालजी टंडन यांचा नातू !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   मंगळवारी सकाळी मध्य प्रदेशचे राज्यपाल आणि भाजपचे वरिष्ठ नेते लालजी टंडन यांचं निधन झालं. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, टीव्हीचा टॉपचा स्टार कुशाल टंडन हा त्यांचा नातू आहे. लालजी टंडन कुशालचे आजोबा होते.

अलीकडेच कुशालनं होमटाऊन लखनऊला जातानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ जवळपास 7 दिवस जुना आहे. यात तो आपल्या बहिण भावांसोबत दिसत होता.

कुशालचे आजोबा गव्हर्नर लालजी टंडन हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांची बिघडलेली प्रकृती पाहिल्यानंतर मध्य प्रदेशच्या राज्यपालाचा कारभार आनंदीबेन पटेल यांच्याकडे सोपवण्यात आला होता.

पंतप्रधानांसह सर्व नेते मंडळींनी लालजी टंडन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या निधनानंतर युपीमध्ये तीन दिवसांच्या राजकीय शोकची घोषणा करण्यात आली आहे.

कुशालच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर यशस्वी मॉडेलिंगच्या करिअरनंतर त्यानं 2011 मध्ये एक हजारों में मेरी बहना या मालिकेतून आपल्या अॅक्टींग करिअरला सुरुवात केली होती. यानंतर त्यानं नच बलिए, बिग बॉस, फियर फॅक्टर अशी रिअॅलिटी शोमध्येही काम केलं. बेहद ही त्याची मालिका खूप गाजली. अलीकडेच तो झी 5 वर रिलीज झालेल्या अनलॉक या सिनेमात दिसला होता.

https://www.instagram.com/p/B_qSBPTJEoc/