Lalu Prasad Yadav Fodder Scam | चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना शिक्षा आणि दंड

रांची : वृत्तसंस्था – Lalu Prasad Yadav Fodder Scam | राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री (Bihar Former CM) लालू प्रसाद यांदव यांना चारा घोटाळा प्रकरणी (Lalu Prasad Yadav Fodder Scam) 5 वर्षांची शिक्षा (Jail) सुनावण्यात आली आहे. त्याशिवाय त्यांना 60 लाखांचाही दंड (Penalty) ठोठावण्यात आला आहे. आज रांचीतील विशेष सीबीआय कोर्टाने (Special CBI Court) दोरांडा चारा घोटाळा प्रकरणी (Doranda Fodder Scam Case) ही शिक्षा सुनावली आहे. 15 फेब्रुवारी रोजी न्यायालयानं लालू प्रसाद यादव यांना या प्रकरणात दोषी ठरवलं होतं.

 

15 फेब्रुवारी रोजी सीबीआय न्यायाधीश एसके शशी (CBI Judge SK Shashi) यांच्या विशेष न्यायालयाने 21 फेब्रुवारी रोजी लालूंसह 38 दोषींना दोषी ठरवत शिक्षेवर सुनावणीची तारीख निश्चित केली होती. लालू यादव सध्या रांची रिम्समध्ये (Ranchi Rims) उपचार घेत आहेत. विशेष सीबीआय न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांना आयपीसीच्या कलम 409, 420, 467, 468, 471, कट रचण्याशी संबंधित कलम 120 बी आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या (Prevention of Corruption Act) कलम 12(2) अंतर्गत दोषी (Guilty) ठरवले आहे.

या प्रकरणात सीबीआयने एकूण 170 आरोपींविरुद्ध आरोपपत्र (Charge Sheet) दाखल केले होते, तर 26 सप्टेंबर 2005 रोजी 148 आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले होते. चार वेगवेगळ्या चारा घोटाळ्यात (Lalu Prasad Yadav Fodder Scam) 14 वर्षांची शिक्षा झालेल्या लालूप्रसाद यादव यांच्यासह 99 जणांविरुद्ध सर्व पक्षकारांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता.

 

काय आहे प्रकरण ?
1990 ते 1995 साली दोरंडा कोषागारातून (Doranda Treasury) बेकायदेशीरपणे 139.35 कोटी रुपये काढण्यात आले होते.
हे चारा घोटाळ्यातील सर्वात मोंठं प्रकरण आहे.
याप्रकरणी 1996 साली 170 आरोपींवर गुन्हा (FIR) नोंदवण्यात आला होता.
त्यामधील 55 आरोपींचा मृत्यू झाला असून 7 आरोपी हे साक्षीदार बनले आहेत.
तसेच दोन आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. तर 6 आरोपी फरार आहेत.
दोरंडा ट्रेझरीमधून 139 कोटी रुपये अवैध पद्धतीने काढल्याप्रकरणात लालू प्रसाद यादव यांना कोर्टाने दोषी ठरवलं आहे.
तर या प्रकरणात इतर 24 जणांची कोर्टानं निर्दोष मुक्तता केली आहे. 1996 साली झालेल्या चारा घोटाळा प्रकरणी तब्बल 26 वर्षांनंतर न्यायालयानं निकाल दिला आहे. आज या प्रकरणातील 38 दोषींवर शिक्षेवर सुनावणी पार पडली.

 

Web Title :- Lalu Prasad Yadav Fodder Scam | lalu prasad yadav sentenced to 5 years jail term rs 60 lakh fine in fodder scam case

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा