भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या

सोयगाव (औरंगाबाद ) : पोलीसनामा ऑनलाईन – सोयगाव येथील उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्य़ालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (सोमवार) सकाळी उघडकीस आली. चेतनलाल रोतरे (वय-३५) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. रोतरे यांच्या अत्महत्येमुळे भूमि अभिलेख कार्यालयात खळबळ उडाली आहे. रोतरे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

चेतनलाल रोतरे हे सोयगाव शहरातील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्य़ालयात निमताणदार या पदावर कार्यरत होते. कार्यालयाच्या चाव्या रोतरे यांच्याकेडच असतात. आज सकाळी कार्यालयाची वेळ झाली असतानाही कार्यालय उघण्यात आले नव्हेत. त्यामुळे येथील कर्मचारी रोतरे यांच्या घरी गेले. त्यावेळी रोतरे यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक गणेश जागडे यांनी कर्मचाऱ्यासह घटनास्थळी धाव घेतली. रोतरे यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसून पोलीस पुढील तपास करीत आहेत.