Lasalgaon : नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्य पर्यटकांची गर्दी

लासलगाव – कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून पक्षीनिरीक्षणासाठी बंद असलेले रामसर दर्जा नुकतेच प्राप्त झालेले पक्षी तीर्थ म्हणून महाराष्ट्राचे भरतपुर समजले जाणारे नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्य पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसात 350 हून अधिक पक्षीप्रेमींनी हजेरी लावत पक्षीनिरीक्षण करत छायाचित्रे काढत मनमुराद आनंद लुटला

गोदावरी, कादवा व दारणा या नद्यांच्या संगमावर असलेले निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर धरणाच्या परिसरातील नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यात हिवाळा सुरू झाल्यानेे पक्षांचा किलबिलाट वाढला आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेेेेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेले पक्षी अभयारण्य पक्षी प्रेमींसाठी शुक्रवारपासून खुले करण्यात आले आहे शुक्रवारी 150 तर शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत 201 पर्यटकांनी पक्षी निरीक्षण करत छायाचित्रे काढण्याचा आनंद घेतला

नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य ठिकाणी पक्षीनिरीक्षणासाठी येताना दुर्बीण, सॅनिटायझर , मास्क व सोशल डिस्टंसिंगचा वापर करणे बंधनकारक असणार आहे आतमध्ये प्रवेश करतांना थर्मल स्कॅनिंग केल्यानंतरच प्रवेश दिला जाणार असल्याने पक्षीप्रेमींनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत पक्षीनिरीक्षण व छायाचित्रे काढत मनमुराद आनंद लुटावा असे आहवान वनपाल अशोक काळे पक्षीप्रेमींना केले

नांदूरमध्यमेश्‍वर अभयारण्यातील पाणथळ जागा हजारो पक्ष्यांना आकर्षित करते ह्याठिकाणी हिवाळी पाहुण्यांचे आगमन सुरु झाले असून अभयारण्यात २६५ पक्षी प्रजातींची नोंद केली गेली आहे फ्लेमिंगो,टिल्स, पोचार्ड, विजन,गडवाल,शॉवलर,पिनटेल,क्रेन,गारगनी, टर्नस्, गज, पेलिकन,गॉडविट,सॅन्ड पायपर, क्रेक, कर्ल्यु, हॅरियर, प्रॅटिनकोल, गल इत्यादि स्थलातंरित पाणपक्षी येथे जास्त प्रमाणात आढळून येतात. पाण कोंबडी,मुग्ध बलाक,गायबगळे,मध्य बगळे, खंड्या,आयबीस, स्टॉर्क इत्याही स्थानिक पक्षी येथे सातत्याने दिसून येत असतात.