हाफिज सईदला आणखी एक झटका, गुरुग्राममधील बंगला जप्त

  • नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि २६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या मालमत्तेवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कारवाई केली आहे. ईडीने हाफिज सईदचा गुरुग्राममधील बंगला जप्त केला असून या बंगल्याची किंमत कोट्यवधी रुपये असल्याची माहिती मिळाली आहे.

    कुख्यात दहशतवादी हाफिज सईदच्या पैशातून खरेदी करण्यात आलेली मालमत्ता सक्तवसुली संचालनालयानं जप्त केली आहे. काश्मिरी उद्योजक जहूर अहमद शाह वटाली याच्या नावे ही मालमत्ता असून, त्या बंगल्याची किंमत अंदाजे १ कोटींहून अधिक आहे. जहूर अहमद शाह वटाली हा लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदच्या पैशांचे सर्व व्यवहार सांभाळतो. या मालमत्तेची किंमत १ कोटी तीन लाख रुपये सांगितली जात आहे.

    दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरविल्याप्रकरणी वटालीला गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अटक झाली होती. त्याच्या चौकशीतून हाफिज सईदच्या मालमत्तेचा उलगडा झाला. त्यानुसार आता ईडीने गुरुग्राममधील बंगला जप्त केला आहे. हाफिज सईदने बनावट नावांचा वापर करून भारतात २५ ठिकाणी मालमत्ता खरेदी केल्याचे तपासातून समोर आले आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

    दहशतवाद्यांना मदत केल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने वटालीसह १८ जणांवार गुन्हा नोंद केला आहे. ईडीच्या माहितीनुसार, या बंगल्याच्या खरेदीसाठी फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशन (एफआयएफ) या संस्थेचा पैसा वापरण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा पैसा संयुक्त अरब अमिरातीतून हवालामार्गे भारतात आल्याचे तपासात उघड झालं आहे.

    हाफिज सईदला दणका –
    संयुक्त राष्ट्राने २००८ मधील मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जमात उद दावाचा प्रमुख हाफिज सईद याचे प्रतिबंधित दहशतवाद्यांच्या यादीतून वगळण्याचे अपील फेटाळले आहे. भारताने हाफिजच्या हालचालीविषयी विस्तृत पुरावे आणि गोपनीय माहिती सादर केल्यानंतर संयुक्त राष्ट्रानी हा निर्णय दिला आहे.

  • लोकसभेच्या उमेदवारीसाठी अखेर सुजय विखे-पाटील यांचा भाजपात प्रवेश
  • २३ मे ला जनतेची ‘मन की बात’ समोर येईल ; शिवसेनेचा भाजपाला टोला
  • मोदींच्या बाल्लेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी काँग्रेस आखणार आज रणनीती
  • ‘दाल में कुछ काला है!, राफेलीची किंमत वाढली कशी ?’
  • संभाजी मालिका बंद होणार ? अमोल कोल्हे म्हणतात…