सत्तेच्या ‘सुवर्ण’युगात भाजपने 2 वर्षांत गमावले ‘हे’ ‘पंचरत्न’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील दोन वर्षांत भाजपच्या पाच मोठ्या नेत्यांचे निधन झाले असून त्यांच्या जाण्याने झालेली हानी न भरून निघणारी आहे. भाजपच्या एकंदर वाटचालीत आणि यशात या सर्वच नेत्यांचा मोठा वाटा होता. या दिग्गज नेत्यांमध्ये अटलबिहारी वाजपेयी, अनंत कुमार, मनोहर पर्रीकर, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांचा समावेश आहे. जाणून घेऊयात या नेत्यांविषयी –

अरुण जेटली :
अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्लीमध्ये २८ डिसेंबर १९५२ रोजी झाला होता. ते महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव होते. माहिती व प्रसारण मंत्री, २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री आणि १३ मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७ या काळात त्यांनी संरक्षणमंत्री, म्हणून त्यांनी काम केलेल्या जेटली यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली होती. श्वसनाच्या त्रासामुळे लागल्याने ९ ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते मात्र या दीर्घ आजाराने आज २४ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांचे निधन झाले.
arun-jaitley

सुषमा स्वराज :
सर्वात कमी वयाच्या कॅबिनेट मंत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा स्वराज राष्ट्रीय स्तरावरील राजकीय पक्षाच्या पहिल्या महिला प्रवक्त्या म्हणूनही प्रचलीत आहेत. याचबरोबर पहिल्या महिला मुख्यमंत्री आणि पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या म्हणून देखील स्वराज यांचे नाव घेतले जाते. मंत्रिपदाबाबत सांगायचे झाल्यास त्यांनी वेळोवेळी अनेक राज्य आणि केंद्रीय पातळीवरील मंत्रीपदे भूषविली होती. १९७७ मध्ये त्या हरियाणाच्या कामगार मंत्री होत्या तेव्हा त्यांचे वय केवळ २५ वर्षे होते. त्यानंतर समाजकल्याण, कामगार यासारख्या आठ खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली. मोदी सरकारच्या कार्यकाळात देशाच्या परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांची कामगिरी गाजली. ६ ऑगस्ट २०१९ रोजी सुषमा स्वराज यांची प्राणज्योत मालवली.
Sushma Swaraj

मनोहर पर्रीकर :
अत्यंत स्वच्छ आणि साधी प्रतिमा असणारे मनोहर पर्रीकर हे राजकारणातील अपवादात्मक व्यक्तिमत्व होते. त्यांची संपूर्ण कारकीर्द तब्बल २५ ते २६ वर्षांची होती. या काळात त्यांनी आपल्या कामगिरीने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. १९९४ साली आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांची कारकीर्द अत्यंत खडतर असल्याचे आपल्यास लक्षात येईल. देशाच्या संरक्षणमंत्रिपदावर असताना त्यांनी देशाच्या सुरक्षाव्यवस्थेसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते. स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी बरेच महिने लढा दिल्यानंतर ते १७ मार्च २०१९ रोजी स्वर्गवासी झाले.

अनंत कुमार :
भाजपचे ज्येष्ठ नेते अनंतकुमार हे मोदी सरकारमध्ये मंत्री होते. त्यांना कर्करोगाचा आजार होता. ज्याचे उपचार त्यांनी लंडनला जाऊन घेतले होते. तिकडून आल्यानंतर महिनाभर ते श्री शंकर कँसर रुग्णालयात उपचार घेत होते. येथे उपचार सुरु असतांना बंगळुरू येथील श्री शंकर कँसर रुग्णालय आणि अनुसंधान केंद्र येथेच त्यांची प्राणज्योत नोव्हेंबर मध्ये मालवली.
anant-kumar

अटलबिहारी वाजपेयी :

भारताचे पंतप्रधानपद तीनदा भूषवणाऱ्या अटलबिहारी वाजपेयी हे किडनीचा त्रास आणि मूत्रमार्गात संक्रमण झाल्यामुळे ११ जून २०१८ पासून एम्समध्ये दाखल होते. मध्य प्रदेश ग्वाल्हेर येथे जन्म झालेल्या वाजपेयींनी ग्वाल्हेरच्या व्हिक्टोरिया महाविद्यालयातून पदवी संपादित केली होती. १६ ऑगस्ट २०१८ रोजी अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन झाले.

आरोग्यविषयक वृत्त –