Late Night Sleeping Side Effects | सावधान ! रात्री उशिरा झोपण्याच्या सवयीमुळे आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Late Night Sleeping Side Effects | रात्री उशिरापर्यंत काम करणे, टीव्ही पाहणे, मोबाइलवर खेळणे अशा सवयींमुळे बरेचजण रात्री उशिरा झोपतात. अनेकांना रात्री १-२ वाजेपर्यंत झोपण्याची सवय (Late Night Sleeping Side Effects) लागते. ही सवय आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक (Harmful To Health) आहे.

 

उशिरा झोपण्यामुळे सर्केडियन रिदम स्लीप डिसऑर्डर (Circadian Rhythm Sleep Disorder) हा आजार होतो. यामुळे आपल्याला विविध प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे झोपेमध्ये अडचण येऊ शकते, बर्याचदा रात्री झोप मोडते आणि झोप पूर्ण शकत नाही. निरोगी आरोग्यासाठी (For Healthy Health) रात्री सात-आठ तास अखंडित झोप आवश्यक असते. चला जाणून घेऊया उशीरा उठणे आणि पुरेशी झोप न मिळणे याचा शरीरावर कसा परिणाम होऊ शकतो (Late Night Sleeping Side Effects) ?

 

रात्री उशिरापर्यंत जागे राहणे आणि झोपेची कमतरता यामुळे आपल्या हृदयावर थेट परिणाम (Effects On Heart) होऊ शकतो. युरोपियन हार्ट जर्नलमध्ये (European Heart Journal) प्रकाशित विश्लेषणानुसार, रात्री ५ तासांपेक्षा आणि ९ तासांपेक्षा जास्त झोप घेतल्याने हृदयाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतात. विशेषतः, झोपेच्या अभावामुळे कोरोनरी हृदयरोग (Coronary Heart Disease) किंवा स्ट्रोकचा (Stroke) धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. वेळेवर झोपणे (Get To Sleep On Time) आणि वेळेवर उठणे (Get Up On Time) या दोन्ही गोष्टी चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत.

मानसिक त्रास (Mental Stress) –
रात्री पुरेशी झोप न मिळाल्याचा परिणाम तुमच्या मानसिक आरोग्यावर आणि मेंदूच्या (Brain) क्षमतेवरही शकतो. एक्सपेरिमेंटल ब्रेन रिसर्चने (Experimental Brain Research) प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार १८ पुरुषांच्या गटाला दोन कामे देण्यात आली. पहिले काम रात्रीच्या चांगल्या झोपेनंतर करायचे होते, तर दुसर्‍या टास्कच्या आधी त्याला रात्रभर जागे राहण्यास सांगण्यात आले होते. संशोधकांना असे आढळले की, ज्यांच्यात एका रात्रीची झोप पूर्ण झालेली नाही, त्या सहभागींच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर आणि परिणाम झाला आहे.

 

झोप न लागण्याचे दुष्परिणाम (Side Effects Of Insomnia) –
पुरेशी झोप न घेतल्याने तुमची सेक्स ड्राईव्ह (Sex Drive) कमी होऊ शकते.
एका अभ्यासात असे आढळले आहे की, ज्या पुरुषांची एका आठवड्यापर्यंत झोप पुरेशी झालेली नाही.
त्या पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी (Testosterone Level) कमी झाली आहे.
५ किंवा त्यापेक्षा कमी तासांच्या झोपेमुळे सेक्स हार्मोनची पातळी १० ते टक्क्यांनी कमी होते.
दररोज रात्री झोप कमी झाली तर, आपल्या मनःस्थितीत आणि उत्साहामध्ये घट होऊ शकते.

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Late Night Sleeping Side Effects | late night sleeping side effects how lack of sleep affects overall health

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrakant Patil | मोफत घरं देण्याच्या निर्णयावरुन चंद्रकांत पाटलांचा निशाणा; म्हणाले – ‘आमदार व्हा म्हणून नारळ दिला होता का?’

 

Pune Crime | वार्षिक 36 % परतावा देण्याच्या अमिषाने अनेकांची 11 कोटीची फसवणूक, पुण्यातील झेन मनी प्लॅन्टच्या संचालकांसह 6 जणांवर FIR

 

Pune Crime | शिवाजीनगर परिसरातील शाळेत घुसून 11 वर्षाच्या मुलीवर बाथरूममध्ये बलात्कार करणारा नराधम अटकेत