Pune Crime | शिवाजीनगर परिसरातील शाळेत घुसून 11 वर्षाच्या मुलीवर बाथरूममध्ये बलात्कार करणारा नराधम अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | शिवाजीनगर परिसरातील एका मुलींच्या शाळेत (School In Shivaji Nagar, Pune) शिरुन एका ११ वर्षाच्या मुलीला जबरदस्तीने बाथरुममध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार (Rape In Bathroom) करणार्‍यास गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) युनिट १ च्या पथकाने गुरुवारी रात्री उशिरा जेरबंद केले (Pune Crime). मंगेश तुकाराम पदुमले Mangesh Tukaram Padumale (वय ३६, रा. गुंजाळवाडी, पांडवनगर) असे या नराधमाचे नाव आहे. (Pune Police Crime Branch Arrested Security Guard In Minor Girl Rape Case Of Shivaji Nagar)

 

मंगेश पदुमले हा या शाळेजवळच्या एका शोरुममध्ये सुरक्षारक्षक (Security Guard Arrested In Rape Case) म्हणून काम करतो. तो पिडित मुलीच्या वडिलांना ओळखत होता.

 

डेक्कन जिमखाना (Deccan Gymkhana) भागात राहणारी ११ वर्षाची मुलगी बुधवारी सकाळी ११ वाजता शाळेत गेली. त्याच्या अगोदरच हा नराधम शाळेत गेला होता. त्याने जिन्यामध्ये या मुलीला अडविले. तिचे आडनाव घेऊन तु यांची मुलगी का असे विचारले. त्यावर या मुलीने हो असे उत्तर दिल्यावर त्याने मी तुझ्या वडिलांना ओळखतो, असे म्हणून तिच्या वडिलांशी मोबाईलवर बोलण्याचा बहाणा केला. यावेळी तेथे आणखी ३ ते ४ मुली होत्या. मात्र, तो या मुलीशी बोलत असल्याने त्यांना तो तिच्या ओळखीचा वाटल्याने त्यांनी तिकडे लक्ष दिले नाही. त्यानंतर त्याने या मुलीशी बोलत तिला दुसर्‍या मजल्यावर नेले. तेथे तिला बाथरुममध्ये ढकलून तिच्यावर बलात्कार केला (Pune Crime).

 

 

बाहेर कोणाला काही सांगितलेस तर बघ अशी धमकी दिली. या घटनेनंतर घाबरलेल्या या मुलीने हा प्रकार आपल्या मैत्रिणीला सांगितला. तिने शिक्षिकांना (Teacher) ही माहिती दिली. शिक्षिकांनी तिच्या आईवडिल व पोलिसांना याची माहिती दिली.

 

पिडित मुलगी व इतर मुलींनी केलेल्या वर्णनावरुन पोलिसांनी या नराधमाचे रेखाचित्र तयार केले.
त्याचवेळी परिसरातील सीसीटीव्हीची (CCTV) तपासणी सुरु करण्यात आली होती.
त्यात एका ठिकाणी हा नराधम दिसून आला. रेखाचित्राद्वारे शोध सुरु करण्यात आला.
त्यात येथील एका शोरुममध्ये तो कामाला होता, याची माहिती मिळाली.
त्यावरुन गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाला तो जनवाडी (Janwadi Pune) येथील एका दारुच्या गुत्यामध्ये असल्याची माहिती समजली.

 

 

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता  (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे (Senior Police Police Inspector Shailesh Sankhe)
आणि त्यांच्या पोलीस पथकाने तेथे जाऊन मंगेश पदुमले याला रात्री उशिरा ताब्यात घेतले.
त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने कृत्याची कबुली दिली. शिवाजीनगर पोलीस (Shivaji Nagar Police) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Arrested Security Guard In Minor Girl Rape Case Of Shivaji Nagar Rape In School Bathroom

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा