Samsung नं लॉन्च केला भारतातील पहिला PM 1.0 फिल्टर AC, ‘व्हायरस’ आणि ‘बॅक्टेरिया’चा होणार नाही ‘एन्ट्री’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड सॅमसंगने भारतात विंड-फ्री एसीची नवीन मालिका लाँच केली आहे. ही कंपनीची एक विशेष एसी मालिका आहे, जो पीएम १.० आकाराचे व्हायरस आणि बॅक्टेरिया फिल्टर करू शकेल. कंपनीचा असा दावा आहे की, हे भारतातील पहिले एअर कंडिशनर आहे, जे 0.3 ㎛ मायक्रो आकारापेक्षा अति सूक्ष्म धुळीचे कण फिल्टर करू शकते. तसेच व्हायरस आणि बॅक्टेरियांना दूर करणारे इलेक्ट्रोस्टेटिक चार्जरसह सुसज्ज आहे.

किंमत आणि उपलब्धता
सॅमसंगने नवीन विंड-फ्री एसीचे तीन मॉडेल बाजारात आणले आहेत. हे तीन मॉडेल्स व्ही कॅसेट, ४ व्ही कॅसेट आणि ३६० कॅसेट आहेत. हे सर्व एसी जीएसटीसह ९०,००० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत येतात. हे सर्व किरकोळ आणि ऑनलाइन चॅनेलवरून खरेदी केले जाऊ शकतात.

वायफाय क्षमतेसह सुसज्ज एसी
या एसीच्या मदतीने घर, रुग्णालय, हॉटेल, मॉल, रेस्टॉरंट आणि किरकोळ यासह अन्य संस्थांमध्ये स्वच्छ व शुद्ध हवा प्रवाहित होऊ शकते. सॅमसंगचा नवीन एसी पीएम १.० फिल्टरसह वाय-फाय क्षमतेसह सुसज्ज आहे. या मालिकेतील नवीन एसी केवळ स्वच्छ आणि श्वास घेण्यायोग्य आरोग्यदायी हवा प्रदान करत नाही, तर यात विंड-फ्री एसी कुलिंगचे तंत्रज्ञान देखील वापरले गेले आहे, जे थेट थंड हवेचा प्रवाह रोखते. तसेच पॉवर सेव्हिंग आणि आरामदायक कूलिंग देखील प्रदान करते. या नवीन विंड-फ्री मॉडेलमध्ये अत्याधुनिक सेन्सरसह एक विशिष्ट सर्च टेक्नॉलॉजी आणि डिस्प्लेचा वापर केला गेला, जे युजर्सना कुलिंग आणि हवेच्या गुणवत्तेशी संबंधित अचूक माहिती प्रदान करते.

तीन प्रकारचे एसी उपलब्ध
नवीन एसी पीएम १.० सेन्सर आणि इतर तीन प्रकारच्या फिल्टरसह येतो, जे प्री-फिल्टर आहेत ते मोठ्या आकारातील धुळीचे कण फिल्टर करतात. यानंतर डियोजोरायझेशन फिल्टर आहे, ज्यामुळे दुर्गंधी दूर होते. तर पीएम १.० फिल्टर ०.३ मायक्रो आकाराच्या अति सूक्ष्म धुळीच्या कणांना स्ट्रालाईज करण्यासाठी एक इलेक्ट्रोस्टेटिक चार्जर आहे. एसीची ही नवीन मालिका निवासी आणि कार्यालयीन वापरासाठी योग्य आहे. हे तीन पॅनेल रूपांमध्ये उपलब्ध आहे

सॅमसंगची इनोव्हेटिव्ह एअर प्युरिफायिंग कुलिंग टेक्नॉलॉजी
पीएम १.० फिल्टर विंड-फ्री एसी मालिकेमध्ये पीएम १.० फिल्टरसह इलेक्ट्रोस्टेटिक चार्जरही आहे, जो ०.३ मायक्रो आकाराच्या अति-सूक्ष्म धुळीच्या कणांना सकारात्मक उर्जा देतो, ज्यामुळे ते नकारात्मक प्लेटला जोडले जातात. त्यानंतर ते इलेक्ट्रोस्टॅटिक चार्जरच्या माध्यमातून त्यांच्यात असलेल्या व्हायरस आणि बॅक्टेरियांना निर्जंतुकीकरण करते. हे पीएम १.० फिल्टर धुऊन पुन्हा वापरले जाऊ शकते.

विंड-फ्री कुलिंग तंत्रज्ञान
सॅमसंगचे विंड-फ्री तंत्रज्ञान तुमच्या शरीरावर थंड हवेचा थेट प्रवाह रोखते. तसेच आरामदायक थंड अनुभव देखील देते. एकदा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तापमान सेट केल्यास, विंड-फ्री हवा हळूहळू १५००० सूक्ष्म छिद्रांद्वारे बाहेर ढकलते, जेणेकरून तुम्हाला अचानक थंडी लागू नये. त्यानंतर विंड-फ्री कुलिंगचा आधुनिक एअर फ्लो खोलीला लवकर थंड करतो.

डियोडोरायझिंग फिल्टर
सॅमसंग विंड-फ्री एसीच्या नवीन मालिकेत असलेले डियोडोरायझिंग फिल्टर इतर गोष्टीं व्यक्तिरिक्त सिगारेट, पाळीव प्राणी आणि खाद्यपदार्थांच्या वासाला शोषून घेते आणि ताजेपणासह एक स्वच्छ वातावरणाचा अनुभव देते.

आयनॉयजर
सॅमसंग एसीच्या या नवीन मालिकेत आयनॉयजर स्थापित करण्याचा पर्याय देखील आहे, जो ऍक्टिव्ह हायड्रोजन आणि ऑक्सिजन आयन प्रदान करतो, जो जैविक प्रदूषण पसरवणारे घटक आणि प्रतिक्रियाशील ऑक्सिजन कमी करण्यास सक्षम आहे. हे आयनॉयजर हवेत असलेले विषाणू आणि बॅक्टेरियांना संपवते आणि हवेची गुणवत्ता सुधारते.