‘या’ बँकचे गृहकर्ज आणि वाहन कर्जाचे ‘EMI’ होणार ‘स्वस्त’, ‘हा’ असेल ‘दर’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या यूनियन बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना गिफ्ट दिलं आहे. हे गिफ्ट देत मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट मध्ये कपात केल्याची घोषणा बँकेने केली आहे. बँकेने विविध टेन्योरसाठी बेंचमार्क उधार दरात ०.०५ – ०.२० टक्के कपातीची घोषणा केली आहे. यानंतर बँकने गृह कर्ज, वाहन कर्ज आणि पर्सनल लोन स्वस्त होणार आहेत. हे नवे दर ऑगस्ट पासून लागू होतील.

MCLR ची कपात झाल्यानंतर याचा सर्वात आधिक फायदा हा होईल की, सध्याचे लोन स्वस्त होईल आणि पहिल्या तुलनेत कमी EMI द्यावा लागणार. हे आरबीआयने फ्रेबुवारीमध्ये रेपो रेटमध्ये ०.७५ टक्के कपात केली आहे. याचा फायदा ग्राहकांना द्यावा असे देखील बँकाना आयबीआयला सांगण्यात आले आहे.

किती स्वस्त झाले लोन –

कपातीनंतर एक वर्ष कलावधीच्या कर्जसाठी MCLR ८.५५ टक्कांवरुन कमी करुन ८.५० टक्के केला आहे. बँकेच्या १ दिवस आणि एक महिन्याच्या कालावधीसाठी व्याजाचा दर कमी करुन ८.१० टक्के करण्यात आला आहे. पहिल्यांदा हे व्याज दर ८.२५ टक्के आणि ८.३० टक्के होते. बँकेच्या ३ महिन्याच्या आणि ६ महिन्यांच्या कालावधीसाठी लोन वर व्याज दर ०.१० टक्क्यांनी कमी करुन ८.२५ टक्के आणि ८.३० टक्के झाले आहेत.

काय आहे MCLR –

MCLR ला मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट म्हणतात. यात बँकच्या फंडसाठी लागणाऱ्या हिशोबावरुन कर्जचे दर ठरवले जातात. ये बँचमार्क दर असतात. याच्या वाढल्याने बँकेतील सर्व प्रकारचे कर्ज महाग होते.

MCLR कमी झाल्याने सामान्य नागरिकांना याचा फायदा हा असतो की, सध्याचे कर्जाचे दर स्वस्त होतात आणि त्याच्या पहिल्या तुलनेत कमी EMI भरावा लागतो.

आरोग्यविषयक वृत्त