15 हजाराची लाच घेताना विधी अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात पंधरा हजार रुपयांची लाच स्वीकारताना विधी अधिकारी अविनाश विश्वनाथ मगर यास रंगेहाथ पकडले. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात आज रात्री ही कारवाई करण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, तक्रारदाराच्या पत्नीचे ओ.बी.सी. कुणबी प्रवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्राचे काम करून देवून प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी जात पडताळणी कार्यालयातील विधी अधिकारी अविनाश विश्वनाथ मगर यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे १५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नगर कार्यालयाकडे तक्रार प्राप्त होताच पोलिस उपअधीक्षक हरीश खेडकर यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने जिल्हा जात पडताळणी कार्यालयात सापळा रचला. जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कार्यालय असलेल्या रेव्हेन्यू सोसायटीचे इमारतीतील तळमजल्यावर तक्रारदारास जात वैधता प्रमाणपत्र देवून आरोपी लोकसेवक अविनाश विश्वनाथ मगर यांनी पंचासमक्ष १५ हजार रुपये स्वीकारले असता त्यास रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

ही कारवाई पोलिस उपअधीक्षक हरीष खेडकर, पोलीस निरीक्षक श्याम पवरे, पोलीस निरीक्षक दिपक करांडे, पो.हे.कॉ. तनवीर शेख, पो.ना. प्रशांत जाधव, पो.ना. रमेश चौधरी, म.पो.कॉ. राधा खेमनर, चालक पो.हे.कॉ. अशोक रक्ताटे यांनी केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –