LCB कडून वाघोलीतील बेकायदेशीर दारु विक्री करणाऱ्या हॉटेलवर छापा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बेकायदेशीरपणे देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्या वाघोलीतील एका हॉटेलवर पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला असून येथून देशी विदेशी दारू जप्त केली आहे.

याप्रकऱणी हॉटेल मालक प्रविण सातव (रा.वाघोली, वडजाई ता.हवेली जि.पुणे) व काउंटरवरील मॅनेजर लक्ष्मण हुसेनी पोतनवरो (वय २३ वर्षे रा.वाघोली ता.हवेली जि.पुणे मूळ रा.मैंदरगी ता.अक्कलकोट जि.सोलापूर) या दोघांवर मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हॉटेल मॅनेजर लक्ष्मण पोतनवरो यास अटक करण्यात आली आहे. जप्त मुद्देमाल व आरोपीस पुढील कारवाईसाठी लोणीकंद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

पुणे ग्रामीण जिल्हयात अवैध धंदयावर कारवाई करणेसाठी पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांनी आदेश दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ७ जून दुपारी ०३.३० लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाघोली चोखीदाणी रोडवरील हॉटेल रानजत्रा येथे अचानक छापा टाकला. त्यावेळी बिगर परवाना व बेकायदेशीरपणे विक्रीसाठीसाठा केलेल्या देशी, विदेशी दारू व बिअरच्या बाटल्या असा एकूण किं.रू.७,१६३/- चा माल जप्त केलेला आहे. तर याप्रकरणी हॉटेल मालक व मॅनेजरविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलीस निरीक्षक गणेश क्षिरसागर, मोरेश्वर इनामदार, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, बाळासो खडके महिला पोलीस कर्मचारी डमरे यांचे पथकाने केली.

Loading...
You might also like