Legislative Council Election | शिवसेनेचा एकाच दगडात निशाणा? एकनिष्ठ राहणाऱ्यांना आमदारकी तर रामदास कदमांना बाहेरचा रस्ता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधान परिषदेच्या जागेसाठी (Legislative Council Election ) शिवसेनेने (Shivsena) एकाच दगडात निशाणा साधून पक्षासोबत एकनिष्ठ न राहणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवला आहे. आदित्य ठाकरे यांच्यासाठी जागा सोडणाऱ्या सुनिल शिंदे (Sunil Shinde) यांना विधान परिषदेची उमेदवारी (Legislative Council Election) देण्यात आली आहे. तर दुसरीकडे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्याविरोधात भाजपला (BJP) रसद पुरवणाऱ्या रामदास कदम (Ramdas Kadam) यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

 

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 5 स्थानिक पदाधिकारी मतदारसंघातून निवडून आलेले 6 सदस्यांपैकी रामदास कदम आणि भाई जगताप (Bhai Jagtap) यांची 1 जानेवारी 2022 रोजी मुदत संपत आहे. त्यामुळे या जागेसाठी कुणाची निवड होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले होते. अखेर शिवसेनेने मुंबईतून विधान परिषदेसाठी सुनिल शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. सुनिल शिंदे यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यासाठी विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघ (Worli constituency) सोडला होता. त्यावेळी त्यांना विधान परिषदेची आमदारकी (Legislative Council Election) दिली जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. शिवसेनेनं आपला शब्द खरा करत शिंदे यांना उमेदवारी देण्यात येत आहे.

 

तर दुसरीकडे शिवसेनेचे आणि परिवहन मंत्री अनिल परब, मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्याविरोधात भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना पुरावे दिल्याचा आरोप आहे. शिवाय रामदास कदम यांच्या ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्यावर नाराज होते. कदम यांना ऑडिओ प्रकरण (Audio case) चांगलेच अंगाशी आले असून त्यांचा विधान परिषदेसाठी पत्ता कट केला आहे. (Legislative Council Election)

 

निवडणूक कार्यक्रम

निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याची दिनांक – 16 नोव्हेंबर 2021

नामनिर्देशन (Nomination) पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक -23 नोव्हेंबर 2021

नामनिर्देशन पत्रांची छाननी – 24 नोव्हेंबर 2021

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक – 26 नोव्हेंबर 2021

मतदानाचा (Voting) दिनांक -10 डिसेंबर 2021

मतदानाची वेळ – सकाळी 8 ते सायंकाळी 4 पर्यंत

मतमोजणी (vote Counting) दिनांक – 14 डिसेंबर 2021

निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक – 16 डिसेंबर 2021

 

Web Title :- Legislative Council Election | shiv sena nominates sunil shinde for maharashtra legislative council election ramdas kadam out

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Katrina Kaif | कतरीना कैफ आणि विकी कौशलच्या ‘संगीत’मध्ये चार चांद लावणार ‘हे’ कपल

PF Nominee | ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या करू शकता आपल्या PF नॉमिनीमध्ये बदल; EPFO सांगत आहे ‘स्टेप बाय स्टेप’ प्रोसेस

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 113 रुग्णांना डिस्चार्ज; जाणून घ्या इतर आकडेवारी