मुख्यमंत्र्यांच्या महत्वकांक्षी ‘जलयुक्‍त’मध्ये गैरव्यवहार, ‘लाचलुचपत’कडून चौकशीचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वकांक्षी जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. याबाबत खुद्द जलसंधारण मंत्री तानाजी जाधव यांनी २४ जून रोजी कबुली दिली आहे. या प्रकरणी आज सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला चौकशी करण्याचे निर्देश दिलेत. यात १३०० प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्यभरातील तब्बल १३०० जलयुक्त शिवारच्या कामांमध्ये गैरव्यवहार झाला आहे. अशा ठिकाणी जिल्ह्याबाहेरच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करुन विभागीय चौकशी सुरू केल्याची माहिती जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी दिली होती. यावर जलसंधारण मंत्र्यांनी असे स्पष्ट केले आहे कि, याबाबत तांत्रिक अहवाल आल्यावरच या प्रकरणात एसीबी चौकशी करायची की नाही हा निर्णय घेऊ. विधानपरिषदेत पुन्हा आज जलयुक्त शिवारच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. गेल्या आठवड्यात हा प्रश्न उपस्थित करण्यात आला असता हा प्रश्न राखून ठेवण्यात आला होता.

जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या समोर आज याबाबत प्रश्न उपस्थित होताच त्यांनी पुन्हा तीच उत्तरे द्यायला सुरुवात केली. तेव्हा विरोधकांनी यावर आक्षेप घेताच सभापती रामराजे निंबाळकर यांनी स्वत: यामध्ये हस्तक्षेप करत लाचलुचपत विभागामार्फत चौकशी करण्याचे निर्देश दिले.

पारधी समाजाच्या महिलेचा विनयभंग करून मिरच्या चोरीच्या आरोपावरून मारहाण

सकाळी लवकर उठणाऱ्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी ?

‘मेंदू’ आणखी तल्लख करण्यासाठी ‘हे’ उपाय आहेत फायदेशिर

‘केस गळणे’ हा असू शकतो आजारपणाचा संकेत

आश्चर्यच ! आता पोटातील गॅस बाहेर पडताच दुर्गंधी ऐवजी दरवळेल सुगंध

वंचितला भाजपची ‘बी’ टीम म्हणणाऱे अशोक चव्हाण नरमले, ती टीका ‘राजकिय’

तब्बल १८ महिन्यापासून पगाराविना,अण्णाभाऊ साठे स्मारक समिती कर्मचाऱ्यांची हेळसांड

जाती-धर्मामुळे मानवतावादी दृष्टिकोनाला तिलांजली दिली जातेय – डॉ. गणेश देवी