Uddhav Thackeray | कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले पांडुरंगाला साकडे

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Uddhav Thackeray | पंढरपूरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे, भक्तीरसात, टाळ मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आषाढी एकादशीच्या महापुजेच्या वेळी पांडुरंगच्या चरणी घातले. भगव्या पताक्यांनी भरलेले पंढरपूर पहायचे आहे, असेही ठाकरे म्हणाले.

महापुजेनंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल -रुक्मिणीच्या छायाचित्राचे अनावरण करण्यात आले. मंदिर समितीने या छायाचित्रांचे पुस्तक स्वरुपात जतन करुन हा वारसा जगापुढे ठेवावा, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईहून स्वत: गाडी चालवत सोमवारी रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास पंढरपूरला पोहचले. शासकीय विश्रामगृहात आगमन होताच काही वेळाने त्यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांकडून कोरोनाविषयक आढावा घेऊन संभाव्य तिसर्‍या लाटेच्या दृष्टीने अधिक जबाबदारीने काम करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या मर्यादित आहे. आरोग्य विभागाने पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत उल्लेखनीय काम केले आहे.
मात्र संभाव्य तिसर्‍या लाटेबाबत सतर्कता बाळगा. टेस्टिंग आणि ट्रिटमेंटवर भर द्या.
नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य द्या.

Web Title : Let the Corona crisis end! Chief Minister Uddhav Thackeray laid a wish at Panduranga

Pune Crime | धक्कदायक ! पुणे जिल्ह्यात 5 लाखांचे मासे चोरीला; शेतकऱ्याची पोलीस ठाण्यात धाव

Scholarship Online Application | विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन !

Theur News | थेऊरचे प्रयोगशील शेतकरी विजय कुंजीर यांना आदर्श कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार

Pandharpur Wari 2021 : संत ज्ञानेश्वर,
संत तुकाराम महाराजांच्या पालख्या शिवशाही बसने पंढरपूरकडे मार्गस्थ