नवीन वर्ष राज्यासाठी कसं असेल ?, अजित पवार यांनी दिला ‘हा’ खास संदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या सावटाखाली सर्वांना सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वेगत करावे लागत आहे. 2020 मध्ये जी वेदना, कुचंबणा, फरफट वाट्याला आली ती नव्या वर्षाय येऊ ने, असे प्रत्येकाला वाटत आहे. नवीन वर्ष कोरोनामुक्तीचं असावं, अशी प्रत्येकाची इच्छा आहे. त्यावरच बोट ठेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला नव्या वर्षाच्या खास शुभेच्छा दिल्या आहे. ‘सर्वांना मुक्तसंचाराचा आनंद लवकर मिळो’, अशी मनोकामना त्यांनी व्यक्त केली आहे.

राज्यातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना अजित पवार म्हणाले, मावळतं वर्ष कोरोना संकटाशी लढण्यात गेलं, येणारं नवीन वर्ष आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृध्दी, उत्तम आरोग्य, समाधान घेऊन येवो, नववर्षाच्या सुरुवातीलाच संपूर्ण जग कोरोनामुक्त होवो, सर्वांना मुक्तसंचाराचा आनंद घेण्याची संधी लवकर मिळो, अशा शब्दात राज्यातील जनतेला 2021 या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मावळत्या 2020 वर्षानं आपल्याला जीवन जगण्यासंदर्भात अनेक नवीन गोष्टी शिकवल्या. त्या गोष्टींपासून बोध घेऊन नववर्षाची सुरुवात करुया. कोरोनाचं संकट अद्याप कायम असल्यानं मास्क लावणं, गर्दी टाळणं, हात वारंवार धूत राहणं या त्रिसूतीचं पालन करुया. कोरोनापासून स्वत: चं, कुटुंबाचं, समाजाचं संरक्षण करीत दैनंदिन व्यवहार हळूहळू काळजीपूर्वक सुरु करुया, असे आवाहन त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशातुन केलं आहे.

येणारे नवीन वर्ष राज्यातील शेतकरी, कष्टकऱ्यांसह सर्व बांधवांना विकासाची संधी उपलब्ध करु देणारं, राज्याला सर्वांगीण प्रगतीच्या वाटेवर नेणारं ठरेल असा विश्वासही त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशातुन व्यक्त केला आहे.