Letter bomb of Pratap Sarnaik । आमदार प्रताप सरनाईक यांना भाजपानं गळ टाकल्याची चर्चा

मुंबई / ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना खुले पत्र पाठवून शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Saranaik) यांनी त्यांना भाजपशी जुळवून घेण्याची अग्रहपणे विनंती केली. काँग्रेस (congress), राष्ट्रवादी (NCP) हे शिवसेनेला (Shiv Sena) कमकुवत करीत आहेत. भाजपशी (BJP) युती केल्यावर शिवसेनेला (Shiv Sena) फायदा होईलच, याव्यतिरिक्त आमच्यासारख्यांना होणारा त्रास देखील वाचेल असा एक लेटरबॉम्ब सरनाईक (Letter bomb of Pratap Sarnaik) यांनी दिला आहे. यामुळे राज्यात चर्चेला उधाण आलं. Letter bomb of Pratap Sarnaik । shivsena mla pratap sarnaik and bjp

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

प्रताप सरनाईक (MLA Pratap Saranaik) यांनी ते पत्र लिहले होते त्या पत्रावर दहा दिवस झाले पक्षप्रमुखांनी निर्णय घेतले नाही.
तसेच शिवसेना वर्धापनदिनीही काहीही त्यावर भाष्य न केल्याने शेवटी ते पत्र प्रसारित केले गेले.
केंद्र आणि राज्याच्या संघर्षात माझा बळी दिला जातोय, असे भाष्य करून त्यावरही पक्षाने भूमिका न घेतल्याने सरनाईक यांच्या पाठीशी किती असमाधानी पाठीमागे उभे राहणार.
असे सवाल शिवसेनेमध्ये (Shiv Sena) चर्चत रंगत आहे.
दरम्यान, प्रताप सरनाईक (MLA Pratap Saranaik) यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बमध्ये आपल्यासोबत आणखी काही जणांची नावे घेली आहे.
तर, लेटर प्रसारित झालं तेव्हा त्यामधील एकजण प्रतिक्रिया देण्यास सरसावला नाही.

या दरम्यान, सरनाईक (MLA Pratap Saranaik) यांनी पक्षप्रमुखांना पाठवलेल्या पात्रातून चर्चा घडवणे ही शिवसेनेची (Shiv Sena) राजकीय संस्कृती नाही.
यारून काही मंत्र्यांनी भारतीय जनता पार्टीशी जुळवून घेतल्याचा रोखही या मंत्र्यांना दुखावणारा आहे.
म्हणूनच, या लेटरवर काय प्रतिक्रिया देणार, असा प्रतिप्रश्न करत शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी प्रताप सरनाईक (MLA Pratap Saranaik) यांनी उपस्थित केलेल्या एकही मुद्द्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.
केवळ विनाकारण त्रास दिल्याचा भाजप (BJP) विरोधाचा मुद्दा तेवढा त्यांनी सांगितला.
दरम्यान, प्रताप सरनाईक (MLA Pratap Saranaik) यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला अकारण लक्ष केल्याची भावना शिवसेनेत (Shiv Sena) दिसत आहेत.
या दोन्ही पक्षांसोबत महाविकास आघाडी स्थापन केल्यानंतर आणि त्याआधी देखील शिवसेनेची राजकीय स्पर्धा केवळ भाजपशी असताना या दोन्ही पक्षांना लक्ष्य करून महाविकास आघाडीत तेढ वाढवण्याची भूमिका नेमकी कोणाची असणार? या प्रश्नावर चर्चा रंगली होती.

पत्र लिहिण्याची वेळ का आली?

प्रताप सरनाईक (MLA Pratap Saranaik) हे विधानसभा निवडणुकीपूर्वी ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं.
त्याला सरनाईक (MLA Pratap Saranaik) यांनी नकार दिला. त्यानंतर सर्न्यिक यांना शिवसेनेतर्फे उमेदवारीही मिळाली.
मीरा-भाईंदरमध्ये भाजप (BJP) आणि नरेंद्र मेहता यांना धक्का देत अपक्ष म्हणून विजयी झालेल्या गीता जैन शिवसेनेत (Shiv Sena) आल्यानंतर प्रताप सरनाईक (MLA Pratap Saranaik) यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांना वेसण घातली गेली.
तसेच, भाजप नेत्यांनी सरनाईक (MLA Pratap Saranaik) हे मातोश्रीवर लपून बसल्याचा आरोपही केला.
तसेच, प्रताप सरनाईक यांच्यामुळे अडचणीत येत गेल्याने मातोश्रीने त्यांच्यापासून सुरक्षित अंतर राखल्याची चर्चा देखील वर्तुळात निर्माण झाली होती.
म्हणून हे पत्र लिहिलेले असल्याची म्हटलं जातंय.

भाजपने गळ टाकल्याची चर्चा..

शिवसेनेची (Shiv Sena) संस्कृती माहित असून देखील आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Saranaik) यांनी पत्र लिहिणे, आणि ते प्रसारित करणे.
यानंतर त्याच भूमिकेचे त्वरित स्वागत करणे. यावरून यामागे भाजपचे (BJP) नेते असल्याची देखील चर्चा रंगली होती.
भाजपने (BJP) काही गळ टाकला आहे का? अशी चर्चा राजकरणात होऊ लागली.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी मात्र ठाण्यात पुरेसे नेते असल्याने आणखी एका नेत्याचा विचार सध्या सुरू नसल्याची तिरकस प्रतिक्रिया दिली आहे.

Web Title : Letter bomb of Pratap Sarnaik । shivsena mla pratap sarnaik and bjp

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Nationalist Congress Party Pune | राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष व माजी महापौर प्रशांत जगताप यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अटक अन् सुटका