लक्षात ठेवा ! LIC 1 फेब्रुवारीपासून ‘या’ 23 स्कीम बंद करणार, लाभ मिळणार नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही जर भारतीय जीवन विमा (LIC) धारक असाल तर आपल्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण, एलआयसी महामंडळ 31 जानेवारीपासून जवळपास २३ योजना बंद करणार आहे. म्हणजेच येत्या 1 फेब्रुवारीपासून आपल्याला या योजनांचा लाभ घेता येणार नाही.

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (इरडा) नोव्हेंबर 2019 मध्ये जीवन विमा कंपन्यांना नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार काही योजना बंद करण्यास सांगितले होते, ज्या योजना त्यामध्ये बसत नाहीत. यासाठी कंपन्यांना 30 नोव्हेंबर 2019 ही अंतिम तारीख देण्यात आली होती. मात्र, त्यांनतर हि मुदत वाढवून 31 जानेवारीपर्यंत करण्यात आली. तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या इतर पॉलिसींमध्ये बदल तसेच पुन्हा परवानगी मिळविण्यासाठी कंपन्यांना 29 फेब्रुवारी 2020 ची मुदत देण्यात आली आहे.

हे 23 प्लॅन होणार बंद :
1) एलआयसी विमा श्री
2) एलआयसी जीवन तरुण
3) एलआयसीजीवन उमंग
4) एलआयसी जीवन लक्ष्य
5) एलआयसीआधार स्तंभ
6) एलआयसीआधार शिला
7) एलआयसी भाग्यलक्ष्मी प्लॅन
8) एलआयसी जीवन शिरोमणि
9) एलआयसी माइक्रो बचत
10) एलआयसी न्यू एंडोमेंट प्लॅन
11) एलआयसी न्यू जीवन आनंद
12) एलआयसी अनमोल जीवन -II
13) एलआयसी जीवन लाभ प्लॅन
14) एलआयसी न्यू जीवन मंगल प्लॅन
15) एलआयसी न्यू मनी बॅक -20 साल
16) एलआयसी न्यू एंडोमेंट प्लस (यूलिप)
17) एलआयसी सिंगल प्रीमियम एंडोमेंट प्लॅन
18) एलआयसी प्रीमियम वेवर रायडर (रायडर)
19) एलआयसी न्यू चिल्ड्रंस मनी बैक प्लॅन
20) एलआयसी लिमिटेड प्रीमियम एंडोमेंट प्लॅन
21) एलआयसी न्यू ग्रुप लीव इनकैशमेंट प्लॅन (ग्रुप प्लॅन)
22) एलआयसी न्यू ग्रुप ग्रेच्युटी कॅश एक्युमुलेशन प्लॅन (ग्रुप प्लॅन)
23) एलआयसी न्यू ग्रुप सुपरएन्युएशन कॅश एक्युमुलेशन प्लॅन (ग्रुप प्लॅन)

दरम्यान, विमा पॉलिसी ग्राहकाभिमुख बनविण्याच्या दृष्टिकोनातून इरडाने हा निर्णय घेतल्याचे समजते. यामुळे ग्राहकाला जास्तीतजास्त फायदा पोहोचविण्याचा उद्देश आहे. अनेक एजंट ग्राहकांची फसवणूक करतात, पॉलिसी चुकीच्या पद्धतीने लोकांना सांगून, फसवून त्यासंदर्भात माहिती न देता विकतात. यावर आळा बसावा हे यामागील मुख्य उद्देश आहे. या संदर्भातच इरडाने मार्गदर्शक तत्वे जारी केली होती.