LIC Dhan Rekha Policy | चांगल्या रिटर्नसाठी ‘या’ पॉलिसीमध्ये करा गुंतवणूक, जाणून घ्या काय आहे विशेष

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC Dhan Rekha Policy | भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC (Life Insurance Corporation) ने एक नवीन योजना आणली आहे. एलआयसीच्या या नवीन पॉलिसीचे नाव धन रेखा (LIC Dhan Rekha Policy) आहे. एलआयसीची ही नॉन-लिंक्ड नॉन-पार्टिसिपेटिंग वैयक्तिक बचत जीवन विमा पॉलिसी तुम्हाला 125% पर्यंत विमा रक्कम देईल.

 

एलआयसीच्या म्हणण्यानुसार या पॉलिसीमध्ये महिलांसाठी विशेष प्रीमियम दर ठेवण्यात आला आहे. याशिवाय त्यात थर्ड जेंडरची तरतूद करण्यात आली आहे.

 

यासोबतच सिंगल आणि लिमिटेड प्रीमियम असे दोन प्रकारचे प्रीमियम भरण्याचा पर्यायही देण्यात आला आहे. शेअर बाजाराशी संबंध नसल्यामुळे त्यात धोकाही कमी आहे. या पॉलिसीशी संबंधित सर्व महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेवूयात…

 

ही आहे पॉलिसीची वैशिष्ट्ये
धनरेखा पॉलिसीच्या मुदतीदरम्यान मृत्यू झाल्यास पॉलिसीधारकाच्या कुटुंबाला पॉलिसी आर्थिक मदत पुरवते. पॉलिसी टर्म दरम्यान नियमित अंतराने ’सर्व्हायव्हल’ लाभ म्हणून मूलभूत सम अ‍ॅश्युअर्डचा एक निश्चित भाग देण्याची तरतूद आहे. परंतु पॉलिसी कार्यरत स्थितीत असावी, अशी अट आहे. (LIC Dhan Rekha Policy)

 

पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर, पॉलिसीधारकाला आधी मिळालेली रक्कम वजा न करता संपूर्ण विमा रक्कम दिली जाईल. त्याच वेळी, पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर, पॉलिसीधारक जिवंत असल्यास, त्याला हमी एकरकमी रक्कम दिली जाते.

मृत्यू लाभ
मृत्यू लाभ एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये 5 वर्षांपर्यंत मिळू शकतो. हे हप्ते मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर घेतले जाऊ शकतात. किमान हप्ता मासिक आधारावर रुपये 5000, त्रैमासिक आधारावर रुपये 15000, सहामाही आधारावर रुपये 25000 आणि वार्षिक आधारावर 50000 रुपये आहे.

 

किमान विमा रक्कम
धन रेखा पॉलिसी ही मनी बॅक योजना (Money Back plan) आहे. यामध्ये, पैसे परत करण्याव्यतिरिक्त,
तुम्हाला शेवटी गॅरंटीड बोनस देखील मिळतो. या योजनेअंतर्गत किमान विमा रक्कम 2,00,000 रुपये आहे. यासाठी कमाल मर्यादा नाही.

 

किती आहे किमान वय
पॉलिसीच्या अटींनुसार, ही योजना 90 दिवसांपासून ते 8 वर्षे वयापर्यंत मुलाच्या नावावर घेतली जाऊ शकते.
त्याचप्रमाणे 35 ते 55 वर्षे वयोगटातील व्यक्तीही याचा लाभ घेऊ शकतात.

 

Web Title :- LIC Dhan Rekha Policy | lic dhan rekha policy for better return 5 things to know

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

EPFO | पीएफ खातेधारकांसोबत होऊ शकते ऑनलाइन फसवणूक, EPFO ने सांगितली बचावाची पद्धत

 

Pimpri-Chinchwad Traffic Police | दिघी-आळंदी वाहतूक विभागांतर्गत ‘No Parking’चे आदेश

 

Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार