Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार

Pune Water Supply | Pune city water supply will closed on Thursday

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Water Supply | पर्वती जलकेंद्राच्या पर्वती एल.एल.आर (Parvati L.L.R.) टाकीची मुख्य पाण्याची लाईन (Water line) व नव्याने टाकण्यात आलेल्या लाईनच्या नव्या जोडणीचे काम गुरुवारी (दि.3 फेब्रुवारी) केले जाणार आहे. त्यामुळे नवीन होळकर व चिखली पम्पिंग भाग, भामा आसखेड जलकेंद्र परिसर येथील विद्युत, पम्पिंग व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे गुरुवारी (दि.3) पाणीपुरवठा बंद (Pune Water Supply) राहणार आहे.

तर शुक्रवारी (दि.4) सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिका पाणी पुरवठा विभागाचे (PMC Water Supply Department) मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर (Chief Engineer Aniruddha Pawaskar) यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे. (Pune Water Supply)

पाणी पुरवठा बंद असणारा भाग

1. पर्वती (LLR) जलकेंद्र परिसर (Parvati (LLR) Water Center)

शहरातील सर्व पेठा (बुधवार दि.2 रोजी रात्री 10 ते गुरुवार दि.3 रात्री 10 पर्यंत आणि शुक्रवार दि.4 रोजी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.) डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, भवानी पेठ, नाना पेठ याथील भागांना कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

2. सहकार नगर (Sahakar Nagar)

सहकार नगर नं.2 मधील सर्व भाग, शाहू वसाहत, लक्ष्मी नगर, मनपा शाळा क्र. 111 चा भाग या परिसरातील गुरुवारी (दि.3) दुपारी 12 ते रात्री 8 या कालावधीत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

3. लष्कर जलकेंद्र परिसर (Lashkar Water Station)

बेकर हिल जुन्या टाकीवर अवलंबून असणारा कौसर बाग परिसर, एन.आय.बी.एम. रोड, उंड्री रोड, साळुंके विहार रोड, उजवी बाजू, लोणकर गार्डन परिसर, वानवडी परिसर काही भाग, कोंढवा गावठाण, भागोदय नगर, मिठानगर, शिवनेरी नगर, गल्ली क्र.1, स.नं. 354, ब्रह्महा इस्टेट, कृष्णा केबल, फकरी हिल, कुबेरा पार्क, ब्रह्मा एव्हेन्यू, शिवगंगा कॉम्प्लेक्स, निवृत्ती एन्क्लेव्ह, माउंट कार्मेल स्कूल, सहानी सुजान पार्क, लुल्लानगर संपूर्ण परिसर.

वानवडी, साळुंके विहार रोड दोन्ही बाजू, केदारी नगर, आझाद नगर, शांती नगर, शिवरकर रोड दोन्ही बाजू, विकासनगर, जगताप नगर, शिंदे छत्री, एसआरपी गट क्र.2 चा भाग, तात्या टोपे सोसायटी परिसर, शिवानंद, दयानंद सोसायटी, जगताप चौक व जांभूळकर चौक परिसर, संविधान चौक, रहेजा गार्डन, गंगा सॅटेलाईट परिसर

4. नवीन होळकर व चिखली पम्पिंग (New Holkar and Chikhali pumping)

विद्यानगर, टिंगरे नगर, कळस, धानोरी, लोहगाव, मुळा रोड

5. भामा आसखेड जलकेंद्र (Bhama Askhed Water Center)

लोहगाव, विमान नगर, वडगाव शेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा

Web Title : Pune Water Supply | Pune city water supply will closed on Thursday

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे,
पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या

 

TET Exam Scam | खळबळजनक ! राज्यात 7880 बोगस शिक्षक, 7880 अपात्र परीक्षार्थींना गुण वाढवून केले पात्र; पुणे पोलिसांच्या तपासात खळबळजनक खुलासा (व्हिडीओ)

Ankita Lokhande Bold Scene | अंकिता लोखंडेनं लग्नानंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! म्हणाली – ‘नो टू..’

Bank Holidays in Feb 2022 | फेब्रुवारी महिन्यात 12 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी आवश्य पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Bhaiyyu Maharaj Suicide Case | भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक दोषी; जाणून घ्या प्रत्येकाचा ‘रोल’