LIC IPO Latest Update | ‘सेबी’कडे (SEBI) जमा झाला ड्राफ्ट, एलआयसीच्या पॉलिसीधारकांना मिळणार 3 कोटी पेक्षा जास्त शेअर; जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC IPO Latest Update | मोदी सरकारने (Modi Government) आज ‘एलआयसी’चा बहुप्रतिक्षित ड्राफ्ट बाजार नियामक सेबी (SEBI) कडे सुपूर्द केला. यानंतर अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. एलआयसीच्या या आयपीओमध्ये कंपनीची एकूण इक्विटी साईज (LIC IPO Size) 632 कोटी शेअर्स असेल. आयपीओमध्ये सुमारे 316 कोटी शेअर्स विकले जातील. (LIC IPO Latest Update)

 

आज सायंकाळी उशिरा जमा झाला ड्राफ्ट
डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक अ‍ॅसेट मॅनेजमेंट (DIPAM) च्या सचिवांच्या Tweeter हँडलवर रविवारी संध्याकाळी उशिरा सांगण्यात आले की एलआयसी आयपीओचा ड्राफ्ट पेपर (LIC IPO Draft Paper) सेबीला सादर करण्यात आला आहे.

 

हा ड्राफ्ट पेपर सेबीच्या अधिकृत वेबसाइट (SEBI Website) वर देखील उपलब्ध आहे. सेबीच्या वेबसाइटवरून ते डाउनलोड करून, आयपीओच्या तपशीलांची माहिती मिळू शकते.

 

The DRHP of LIC IPO has been filed today with the SEBI. pic.twitter.com/jM9CDBMWVH

 

 

पॉलिसीधारकांसाठी जास्त संधी
एलआयसी आयपीओच्या ड्राफ्ट पेपरनुसार, एकूण इक्विटी साईज 632 कोटी शेअर्स असणार आहे. या आयपीओद्वारे सरकार आपला 5 टक्के हिस्सा विकणार आहे. (LIC IPO Latest Update)

 

सध्या सरकारची आयपीओमध्ये 100% हिस्सेदारी आहे. या आयपीओमध्ये, 10 टक्के हिस्सा एलआयसीच्या पॉलिसी धारकांसाठी राखीव असणार आहे. याचा अर्थ एलआयसीच्या पॉलिसीधारकांना एलआयसीमध्ये ‘बीड’ मिळवण्याची अधिक शक्यता असेल.

इतके कोटी शेयर विकणार सरकार
DIPAM सचिवांनी एका वेगळ्या ट्विटमध्ये सांगितले की, या आयपीओद्वारे सरकार सुमारे 316 कोटी शेअर्स विकणार आहे. यापैकी 3.16 कोटी शेअर्स अशा लोकांसाठी राखीव असतील ज्यांच्याकडे एलआयसी पॉलिसी आहे.

 

ते म्हणाले की हा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS) असेल. यामध्ये एलआयसीचा कोणताही नवीन इश्यु (Fresh Issue) असणार नाही.

 

अशा गुंतवणूकदारांसाठी इतके रिझर्व्हेशन
आयपीओ ड्राफ्टनुसार, यातील 50 टक्के हिस्सा क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल इनव्हेस्टरसाठी (QIB) राखीव असेल. याचा अर्थ एकूण 31,62,49,885 शेयरपैकी अर्धे म्हणजे सुमारे 15.8 कोटी शेयर क्यूआयबीसाठी बाजूला ठेवले जातील. त्याच वेळी, 15 टक्के शेअर्स नॉन-इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरसाठी राखीव ठेवण्यात येतील.

 

DIPAM सेक्रेटरींनी दिली होती ही माहिती
डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक असेट मॅनेजमेंटचे सेके्रटरी (DIPAM) तुहिन कांत पांडे यांनी अलीकडेच सांगितले होते
की प्रस्तावित आयपीओमध्ये एलआयसीच्या लाखो विमा धारकांसाठी सवलत दिली जाऊ शकते.

 

ते म्हणाले होते की, पॉलिसीधारकांना इश्यू किमती (Issue Price) वर सूट (Discount)  देण्यासाठी एलआयसी कायद्यात (LIC Act) आवश्यक सुधारणा करण्यात
आल्या आहेत. या आयपीओमध्ये काही भाग एलआयसीच्या कर्मचार्‍यांसाठी राखीव ठेवला जाऊ शकतो.

या आयपीओकडून सरकारला मोठ्या आशा
या आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकी (Disinvestment) सोबतच वित्तीय तुटी  (Fiscal Deficit) च्या आघाडीवरही सरकार मागे पडले आहे.
निर्गुंतवणुकीच्या उद्दिष्टात सुधारणा करूनही सरकार अजून अनेक मैल दूर आहे.

 

यापूर्वी 2021-22 मध्ये निर्गुंतवणुकीतून 1.75 लाख कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते.
सरकारने यात घट करून 78 हजार कोटी रुपये केले आहे. आतापर्यंत सरकारला निर्गुंतवणुकीतून केवळ 12 हजार कोटी रुपये मिळाले आहेत.
अशा स्थितीत, लक्ष्य साध्य करण्यासाठी सरकारच्या सर्व आशा एलआयसी आयपीओवर टिकून आहेत.

 

 

Web Title :-  LIC IPO Latest Update | lic ipo latest update draft papers filed with sebi size price band dipam tweet

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | खळबळजनक ! पुण्याच्या देहुगावात पत्नीनं साथीदारांच्या मदतीनं केली पतीची ‘गेम’, कारण जाणून बसेल धक्का

 

Pune Crime | अभ्यासासाठी मुलाला का मारते? पती रागावल्याने पत्नीने उचलले टोकाचं पाऊल

 

Torna Fort News | दुर्दैवी ! तोरणा गडावर चढताना डोक्यात दगड पडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू