Pune Crime | खळबळजनक ! पुण्याच्या देहुगावात पत्नीनं साथीदारांच्या मदतीनं केली पतीची ‘गेम’, कारण जाणून बसेल धक्का

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पतीच्या छळाला (Persecution) कंटाळून पत्नीने टोकाचं पाऊल उचललं. पत्नीने आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने पतीचा खून (Husband Murder) केल्याची खळबळजनक घटना पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) देहूगाव (Dehugaon) परिसरात घडली आहे. एवढेच नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी साथीदारांच्या मदतीने पतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. हा प्रकार 30 जानेवारी रोजी रात्री अकराच्या सुमारास घडला.

 

आकाश अशोक गोरखे (Akash Ashok Gorkhe) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. पत्नी ज्योती आकाश गोरखे Jyoti Akash Gorakh (वय-19) साथिदार सोनी उमेश जेगरे Soni Umesh Jagre (वय-31), रवी धनू राठोड Ravi Dhanu Rathod (वय-29 दोघे.रा. देहूरोड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह अक्षय लोंढे Akshay Londhe (रा. जाधववाडी, चिखली), राम विजय महोतो Ram Vijay Mahato (रा. पटणा, बिहार), साहिल (पूर्ण नाव माहित नाही) हे फरार झाले असून पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे. याबाबत पोलीस हवालदार बळीराम चव्हाण (Police Constable Baliram Chavan) यांनी शनिवारी (दि.12) देहूरोड पोलीस ठाण्यात (Dehuroad Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड पोलीस ठाण्यात (Dehu Road Police Station) आकाश गोरखे हा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली होती. पोलिस आकाशचा शोध घेत असताना धक्कादायक माहिती समोर आली. आकाश हा बेपत्ता झाला नसून त्याचा खून झाल्याची माहिती समोर आली. आकाशचा खून त्याची पत्नी आणि तिच्या इतर साथिदारांनी मिळून केल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली.

पती आकाश गोरखे हा आरोपी पत्नी ज्योती हिचा छळ करुन मारहाण (Beating) करत होता.
या कारणावरुन आरोपीं अक्षय, राम आणि साहील यांनी आकाशचा खून करण्याचा कट रचला.
आरोपी अक्षय, रावी आणि साहिल यांनी 30 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता आकाश गोरखे याला देहूगाव कमान येथून अज्ञात ठिकाणी नेले.
त्याठिकाणी आकाशला बेदम मारहाण करुन त्याचा खून केला.

 

खून केल्यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी आकाशच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली.
बेपत्ता असलेल्या आकशचा तपास केल्यानंतर पोलिसांना ही धक्काद्यक माहिती मिळाली.
पोलिसांनी आरोपी पत्नी ज्योती व तिच्या साथिदारांवर खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
तर काही साथिदार फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पुढील तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील (Senior Police Inspector Varsharani Patil) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | wife took the last step husband murdered with the help of accomplices incident in Dehugaon of pune district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Torna Fort News | दुर्दैवी ! तोरणा गडावर चढताना डोक्यात दगड पडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू

 

Pension Seva SBI | Pension खात्यात येत राहावी यासाठी SBI ने आणली विशेष सेवा, जाणून घेणे आवश्यक

 

JSY Scheme | विवाहित महिलांसाठी खुशखबर ! मोदी सरकार खात्यात ट्रान्सफर करेल 3600 रुपये, तात्काळ करा अर्ज