LIC Jeevan Anand Policy | 1400 रुपये जमा केल्यानंतर मिळतील 25 लाख रुपये, जाणून घ्या एलआयसीच्या जीवन आनंद पॉलिसीची वैशिष्ट्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC Jeevan Anand Policy | जर तुम्ही एलआयसीच्या जीवन आनंद पॉलिसी (LIC Jeevan Anand Policy) मध्ये गुंतवणूक करण्याचा प्लान करत असाल तर आम्ही तुम्हाला याचे फायदे सांगणार आहोत. या पॉलिसीमध्ये मॅच्युरिटी बेनिफिट मिळते आणि नॉमिनीचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा लाभ मिळतो, अशावेळी एलआयसीची जीवन आनंद पॉलिसी तुमच्यासाठी चांगला ऑपशन होऊ शकते.

 

या पॉलिसीमध्ये प्रीमियम टर्म आणि पॉलिसी टर्म समान आहेत. म्हणजे जेवढ्या कालावधीची तुमची पॉलिसी आहे तेवढ्याच कालावधीच्या प्रीमियमचे पेमेंट करू शकता. पॉलिसीत महिन्यात सुमारे 1400 रुपये जमा केल्यानंतर तुम्हाला 25 लाख रुपये मिळतील.

 

2 वेळा मिळतो बोनस
या पॉलिसीमध्ये 2 वेळा बोनस मिळतो परंतु 2 वेळा बोनससाठी पॉलिसी 15 वर्षाची होणे आवश्यक आहे. जर पॉलिसीच्या दरम्यान व्यक्तीचा मृत्यू झाला तर नॉमिनीला पॉलिसीच्या 125 टक्के डेथ बेनिफिट मिळेल. जर पॉलिसी धारकाचा मृत्यू पॉलिसीचा कालावधी संपल्यानंतर झाला तर त्यास सम अ‍ॅश्युअर्डच्या बरोबरीने पैसे मिळतील.

किमान सम अ‍ॅश्युअर्ड 1 लाख रुपये
या पॉलिसीत 1 एक लाख रुपयांचा किमान सम अ‍ॅश्युअर्ड असतो आणि कमाल सम अ‍ॅश्युअर्ड कोणतेही लिमिट नाही. या पॉलिसीमध्ये 4 रायडर्स असतात. जसे की अ‍ॅक्सीडेंटल डेथ अँड डिसअ‍ॅबिलिटी रायडर, अ‍ॅक्सीडेंट बेनिफिट रायडर, न्यू टर्म अ‍ॅश्युरन्स रायडर आणि न्यू क्रिटिकल इलनेस बेनिफिट रायडर इत्यादी. ही पॉलिसी 5, 10 आणि 15 वर्षासाठी घेऊ शकता. यामध्ये टॅक्स सवलतीचा लाभ घेऊ शकता.

 

कॅलक्युलेशन
जर 35 वर्षाच्या वयात 5 लाख रुपयांचा सम अ‍ॅश्युअर्ड घेतला तर पॉलिसीचा कालावधी 35 वर्ष आहे,
तर वार्षिक प्रीमियम 16,300 रुपये असेल. हाच प्रीमियम तुम्ही सहामाही, तिमाही आणि दर महिना देऊ शकता.

 

35 वर्षामध्ये एकुण 5.70 जमा होतील. म्हणजे महिन्यात सुमारे 1400 रुपये जमा केल्यास तुम्हाला मॅच्युरिटीवर एकुण 25 लाख रुपये मिळतील.
यातून बेसिक सम अ‍ॅश्युअर्ड 5 लाख रुपये होतील.
रिव्हिजनरी बोनस 8.60 लाख रुपये आणि फायनल अ‍ॅडिशनल बोनस 11.50 रुपये दिला जाईल.

 

Web Title :- LIC Jeevan Anand Policy | lic jeevan anand policy get rupees 25 lakh by investing rupees 1400 in lic jeevan anand policy

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुण्यातील संतापजनक घटना ! घरात घुसून 26 वर्षीय नवविवाहितेवर अत्याचार, प्रचंड खळबळ

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार औरंगाबाद कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध ! MPDA कायद्यान्वये पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची 51 जणांवर कारवाई

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 100 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी