दिवसाला फक्त 18 रूपयांची ‘बचत’ करून घ्या ‘ही’ LIC ची पॉलिसी, मिळवा 4 लाखांपेक्षा अधिक ‘लाभ’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विमा क्षेत्रातील सरकारी कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या LIC ने आपल्या ग्राहकांसाठी काही विशेष प्लॅन सादर केले आहेत. जे गुंतवणूकदार चांगल्या सुरक्षित गुंतवणूकीचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी एलआयसीने आणलेल्या या योजना फायदेशीर ठरु शकतात.

LIC जीवनलाभ योजना –
ही योजना शेअर मार्केटवर आधारित नाही. या खास योजनेत काही मर्यादित कालावधीसाठी प्रिमियम भरावा लागतो. त्यामुळे गुंतवणूकीच्या दृष्टीने ही योजना अत्यंत फायदेशीर आहे. ज्या गुंतवणूकदारांना सुरक्षित आणि निश्चित परतावा हवा आहे त्यांच्यासाठी ही योजना लाभकारक आहे.

518 रुपये गुंतवा, 4.04 लाख रुपये मिळवा –
एलआयसीची एक खास योजना आहे, ज्याच्या मॅच्युरिटीचा कालावधी जास्त ठेवण्यात आला आहे. या कारणाने या योजनेत गुंतवणूक केल्यास जास्त फायदा मिळतो. या योजनेत 8 ते 59 वर्ष वयोगटाचे लोक गुंतवणूक करु शकतात. यामध्ये मॅच्युरिटीचा कालावधीसाठी 75 वर्ष वयाची अट आहे. 16 ते 25 वर्षांपर्यंत तुम्ही पॉलिसी टर्म घेऊ शकतात.

या योजनेत कमीत कमी 2 लाख रुपये आणि जास्तीत जास्त कितीही रुपये गुंतवता येतात. विशेष म्हणजे या योजनेत अपघाती निधन आणि अपंगत्वासाठी मिळणाऱ्या नुकसान भरपाईचा लाभ मिळतो. उदा. 25 वर्षांपर्यंत 1 लाख 55 हजार 328 रुपयांचा प्रिमियम भरलात तर तुम्हाला बोनससह जवळपास 4.04 लाख रुपये मिळतील. यासाठी महिन्याला 518 रुपयांचा प्रिमियम भरावा लागेल.

काय आहेत पॉलिसीची वैशिष्टये
या पॉलिसीमध्ये देण्यात आलेला प्रिमियम भरण्याचा कालावधी मॅच्युरिटीच्या कालावधीपेक्षा कमी असेल. ही पॉलिसीत 16,21,25 असे कालावधीचे पर्याय मिळतात. विशेष म्हणजे 3 वर्ष हप्ता भरल्यास योजनेवर कर्ज मिळू शकते. शिवाय तुम्ही जो हप्ता भराल त्यावर तुम्हाला कलम 80 C नुसार करात सूट देखील मिळेल.

Visit : Policenama.com