LIC ची खास पॉलिसी : फक्‍त 15 रूपये खर्च करून मिळवा लाखो रूपयांचा फायदा, गरज भासल्यास मिळणार तात्काळ, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल असावे आणि सुरक्षित असावे असे प्रत्येक जणाला वाटत असते. त्यासाठी भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी) ने नवीन योजना आणली आहे. ज्यामध्ये लहान मुलांच्या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले गेले आहे. आम्ही तुम्हाला एलआयसीच्या ‘न्‍यू चि‍ल्‍ड्रन्‍स मनी बॅक प्‍लान’ विषयी आज माहिती सांगणार आहोत. नुकतीच हि नवीन पॉलिसी एलआयसीने तयार केली आहे.

पॉलिसीच्या खास गोष्टी

१) कमीतकमी २ वर्षांपासून ते १२ वर्षांपर्यंतच्या मुलांची तुम्ही पॉलिसी काढू शकता.
२) कमीतकमी विमा राशी १ लाख रुपये आहे
३) जास्तीत जास्त विमा राशीची कोणतीही मर्यादा नाही. यासाठी प्रीमियम वेवर बेनिफिट राइडर हा ऑप्शन उपलब्ध आहे.

या प्रकारे मिळणार पैसे

पॉलिसीधारकाला १८, २० किंवा २२ वय पूर्ण झाल्यानंतर विम्याच्या २० टक्के रक्कम मिळेल. त्यानंतर विम्याची कालमर्यादा पूर्ण झाल्यानंतर पॉलिसीधारकाला उरलेली ४० टक्के रक्कम बोनससह मिळेल.

डेथ बेनिफिट –

जर पॉलिसीचा कालावधी पूर्ण व्हायच्या आत विमाधारकाचा मृत्यू झाला तर त्याला बोनससह अंतिम रक्कम दिली जाईल. त्याचबरोबर संपूर्ण रकमेच्या १०५ टक्के रक्कम तुम्हाला दिली जाईल.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like