LIC Pension Plan | म्हतारपणापर्यंत करावी लागणार नाही प्रतिक्षा, कोरोना काळात LIC ने आणलाय 40 व्या वर्षापासूनचा पेन्शचा ‘हा’ जबरदस्त प्लॅन

नवी दिल्ली : आपली सेव्हिंग एकरकमी सिंगल प्रीमियमच्या रूपात LIC च्या या नवीन प्लॅनमध्ये (LIC Pension Plan) टाकून तुम्ही 40 वर्षाच्या वयात पेन्शनची सुविधा घेऊ शकता. ही सुविधा आजीवन तुम्हाला मिळेल आणि तुमचे पैसेही पूर्ण सुरक्षित राहतील आणि पेन्शनरच्या (LIC Pension Plan) मृत्यूनंतर नॉमिनीला मिळतील.

40-80 वर्षाचे लोक घेऊ शकतात लाभ :

एलआयसीच्या सरल पेन्शन योजनेत ते सर्व फिचर आहेत जे यापूर्वीच्या प्लॅनमध्ये नव्हते. म्हणजे तुम्ही 40 ते 80 वर्षाच्या वयात कधीही एकरकमी रक्कम जमा करून दर महिना, तिमाही, अर्धवार्षिक किंवा वार्षिक पेन्शन घेऊ शकता. ही पेन्शन आयुष्यभर मिळेल. पहिली लाईफ एन्युटी विथ 100 पर्सेंट रिटर्न ऑफ परचेज प्राईस सिंगल लाईफसाठी आहे.

म्हणजे ही पेन्शन योजना एकाच व्यक्तीसंबंधी असेल. पेन्शधारक जोपर्यंत जिवंत आहे, त्यास पेन्शन मिळत राहील. त्यानंतर नॉमिनीला बेस प्रीमियम मिळेल. दुसरी पेन्शन योजना जॉईंट लाईफसाठी दिली जात आहे. यामध्ये पती किंवा पत्नी जो सुद्धा मोठ्या कालावधीपर्यंत जिवित राहातो, त्यास पेन्शन मिळते. जेव्हा दोघेही राहात नाही तेव्हा नॉमिनीला बेस प्राईस मिळेल. या प्लॅनमध्ये पॉलिसी सुरू होण्याच्या तारखेपासून 6 महिन्यानंतर पॉलिसी होल्डरला कोणत्याही वेळी लोन मिळू शकते.

जर तुमचे वय 40 वर्षे आहे आणि तुम्ही 10 लाख रुपयांचा सिंगल प्रीमियम जमा केला आहे तर तुम्हाला
वार्षिक 50250 रुपये मिळण्यास सुरूवात होईल जे आयुष्यभर मिळतील. याशिवाय जर तुम्हाला मध्येच
आपली जमा केलेली रक्कम परत हवी असेल कारण तुम्हाला पैशाची गरज असेल अशा स्थितीत 5 टक्केची
कपात करून जमा केलेली रक्कम परत मिळू शकते. जर तुम्हाला प्लॅन घ्यायचा असेल तर LIC ची वेबसाइट
किंवा ऑफिसमध्ये जाऊन याची पूर्ण डिटेल आवश्य घ्या. ही पेन्शन योजना ऑनलाइन आणि ऑफलाइन
दोन्ही पद्धतीने घेऊ शकता.

हे देखील वाचा

RITES Recruitment 2021 | सरकारची नोकरीची सुवर्णसंधी; RITES मध्ये विविध पदांची भरती जारी

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 221 नवीन रुग्ण; 163 जणांना डिस्चार्ज

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  LIC Pension Plan | will not have wait till old age lic has brought tremendous pension plan age 40 corona period

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update