Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 221 नवीन रुग्ण; 163 जणांना डिस्चार्ज

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (pimpri Chinchwad corona) दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. शहरात आज नविन रुग्णांची संख्या तिनशेच्या आत आहे. परंतु मागील काही दिवसांपासून शहरात बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा (Recover Patient) नवीन रुग्णांची संख्या अधिक आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये 221 नवीन रुग्ण (Pimpri Chinchwad Corona) आढळून आले आहेत. तर 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापुर्वी मृत्यू झालेल्या अहवाल आज आल्याने नोंद) झाली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकही मृत्यू झाला नाही.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 221 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 61 हजार 736 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 163 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 56 हजार 242 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात 1176 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण
शहरामध्ये सध्या 1 हजार 176 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे. आज दिवसभरात शहरातील 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4318 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात 3602 जणांचे लसीकरण

शुक्रवारी (दि.16) शहरामध्ये 13 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. तर 12 खासगी कोविड -19 लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 03 हजार 602 जणांना लस देण्यात आली आहे. यामध्ये खासगी लसीकरण केंद्रावर 2188 तर पालिकेच्या लसीकरण केंद्रावर 1414 जणांनी लस घेतली. आजपर्यंत शहारमध्ये 9 लाख 04 हजार 078 जणांना लस देण्यात आली आहे.

Web Titel :- Pimpri Corona | 221 new corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Monsoon Diet Tips | पावसाळ्यात ‘या’ 6 वस्तू खाणे टाळा, गंभीर आजाराचे बनू शकतात कारण; जाणून घ्या

Ayurveda Morning Routine | सकाळी उठून करा ही 8 कामे, नेहमी रहाल निरोगी आणि आनंदी

clove | सकाळी रिकाम्या पोटी 2 लवंग खा; अनेक आजारावर रामबाण उपाय

Rosemary Tea | हा चहा पिऊन दिवसाची करा सुरूवात; तुम्हाला 7 आश्चर्यकारक फायदे मिळतील, जाणून घ्या