LIC ची खास पॉलिसी ! फक्त 1 हजार रूपये जमा केल्यानंतर मिळणार 1 लाख, Loan ची देखील सुविधा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एलआयसी ही विमा क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे. एलआयसीने नुकतेच अशा अनेक योजना आणल्या आहेत ज्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती असेल. न्यू मनी बॅक स्कीम (25 वर्षे) हा ही त्यातलाच एक भाग आहे. ही नॉन-लिंक्ड लाइफ इन्शुरन्स पॉलिसी आहे जे गॅरंटीड रिटर्न्स आणि बोनस देते. या योजनेत आपणास केवळ 20 वर्षांचे प्रीमियम द्यावे लागेल, ही पॉलिसी 25 वर्षांची आहे. ही योजना 13 ते 45 वर्षे वयोगटातील जोडीदार 25 वर्षांच्या निश्चित कालावधीसाठी घेऊ शकते. या अंतर्गत पॉलिसीधारकांना 15 % रक्कम प्रत्येक पाच वर्षांसाठी देण्यात येणार आहे आणि उरलेली 40 % रक्कम सिंपल रिव्हर्सनरी बोनस म्हणजेच फाइनल एडीशन बोनस योजनेच्या शेवटी देण्यात येईल.

पॉलिसीबाबतची अधिक माहिती पुढीलप्रमाणे –

– 20 वर्षांच्या कालावधीसाठी मनी बँक योजना
– प्रत्येक पाच वर्षांच्या शेवटी पॉलिसीधारकाला 15% रक्कम मिळणार
– उरलेली 40% रक्कम पॉलिसीधारकांना पॉलिसीच्या शेवटी मिळेल तसेच यासोबत पॉलिसीधारकांना सिंपल रिव्हर्सनरी बोनस म्हणजेच फाइनल एडीसन बोनस सुद्धा मिळणार आहे.
– या सोबत एलआयसीने अपघाती मृत्यू आणि अपंगत्वाचा फायदा असाही एक बहुमूल्य पर्याय या अंतर्गत दिलेला आहे.

मृत्यू नंतर लाभ –

जर पॉलिसी सुरु असताना पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसदाराला पॉलिसीचा फायदा मिळेल तसेच पॉलिसीच्या शेवटी असणारा बोनस देखील मिळणार आहे.

– मूळ रकमेच्या 125%

– वार्षिक हफ्त्याच्या 10 पट

पॉलिसीधारक जिवंत राहिला तर त्याला हा फायदा मिळणार –

– 5 व्या वर्षाच्या शेवटी ठरलेल्या रकमेचे 15%

– 10 व्या वर्षाच्या शेवटी 15%

– 15 व्या वर्षाच्या शेवटी 15%

– 20 व्या वर्षाच्या शेवटी 15%

– 25 वर्षापर्यंत ही योजना सुरु असणार आहे.

फायदे –

जर पॉलिसीधारक शेवट्पर्यंत जिवंत राहिला तर त्याला पुढील फायदा मिळणार आहे.
शिल्लक राहिलेली रक्कम (विम्याची रक्कम 40%) + रिव्हर्सनरी बोनस + फाइनल एडिसन बोनस (जर असेल तर )

कराचा लाभ – सध्याच्या प्राप्तिकर कलम 80C सी च्या नियमांनुसार, जीवन विम्यात भरले जास्तीत जास्त प्रीमियम रू. 1,50,000 ची सूट देण्यात आली आहे. परिपक्वतानंतर प्राप्त रक्कम आयकर कलम १० (१०) डी अंतर्गत करमुक्त देखील आहे. (विशिष्ट अटीनुसार)

कर्ज –
जर आपल्या पॉलिसीला सरेंडर व्हॅल्यू मिळाला असेल तर आपण या योजनेअंतर्गत कर्जाची सुविधा घेऊ शकता. कर्जाची रक्कम आणि त्यावरील व्याज दर वेळोवेळी बदलत असतात आणि याबाबतची माहिती जवळच्या कार्यालयात जाऊन घ्यावी लागेल.

कोणत्याही अपघाताच्या 180 दिवसात कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास, पॉलिसी धारकास दहा वर्षांच्या कालावधीसाठी समान मासिक हप्त्यांमध्ये अ‍ॅक्सिडेंट बेनिफिट दिले जाईल.

या रायडरचा भविष्यातील प्रीमियम देखील माफ केला जाईल. या व्यतिरिक्त, मूळ प्रीमियमपेक्षा अपघात लाभ समान रक्कमेची समान रक्कम कमी केली जाईल.

महत्वाच्या गोष्टी –

5 वर्षानंतर मूळ विमा रकमेच्या 15% = रु 1,00,000 चे 15% = रु 15,000

10 वर्षानंतर मूळ विमा रकमेच्या 15% = रु 1,00,000 चे 15% = रु 15,000

15 वर्षानंतर मूळ विमा रकमेच्या 15% = रु 1,00,000 चे 15% = रु 15,000

20 वर्षानंतर मूळ विमा रकमेच्या 15% = रु 1,00,000 चे 15% = रु 15,000

पॉलिसी मुदत पूर्ण झाल्यानंतर –

मूळ रकमेच्या 40% + सिंपल रिव्हर्सनरी बोनस + अंतिम अ‍ॅडिसन बोनस = 40,000 + सिंपल रिव्हर्सनरी बोनस + अंतिम अ‍ॅडिसन बोनस इतका लाभ भेटेल आणि पॉलिसी कालावधी पूर्ण होईल.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी