LIC Share Share Price | LIC चा शेअर 653 रूपयांवर आला, लिस्टिंगनंतर 32 टक्के घसरला, तुमच्याकडे सुद्धा आहे का?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC Share Share Price | एलआयसीचा शेअर शुक्रवारी केवळ 653 रूपयांचा झाला. इश्यू प्राईसपासून हा शेअर सुमारे 32 टक्के घसरला आहे. हा शेअर 17 मे रोजी बीएसई आणि एनएसईवर लिस्ट झाला होता. त्यानंतर यामध्ये सातत्याने घसरणीचे सत्र सुरू आहे. या आठवड्यात अँकर इन्व्हेस्टर्ससाठी लॉक-इन पीरियड संपल्यानंतर यामध्ये घसरण दिसून आली आहे. (LIC Share Share Price)
शुक्रवारी झालेल्या घसरणीनंतर एलआयसी शेअर लिस्टिंगनंतर आशियामध्ये सर्वात जास्त घसरणारा शेअर बनला आहे. दुसर्या नंबरवर दक्षिण कोरिया कंपनी एलजी एनर्जी सोल्यूशन आहे. तिचा शेअर लिस्टिागनंतर 30 टक्के घसरला आहे.
शुक्रवारी एलआयसी मार्केट कॅपिटलायजेशन घसररून 4.13 लाख कोटी रुपये राहीले. एसबीआय देशातील सर्वात जास्त व्हॅल्यूएशनच्या टॉप कंपन्यांच्या यादीतून बाहेर गेली आहे. ती आता सहाव्या स्थानावर आली आहे. लिस्टिंगपासून आतापर्यंत या शेअरने इन्व्हेस्टर्सचे 1.87 लाख कोई रूपये बुडवले आहेत. 17 मेरोजी लिस्टिंगच्या दिवशी तिचे मार्केट कॅपिटलायझेशन 6 लाख कोटी रूपये होते. तेव्हा ती देशातील पाचवी सर्वात मोठी कंपनी होती. (LIC Share Share Price)
एलआयसी आयपीओ 3 मे रोजी ओपन झाला होता. तो 9 मे रोजी बंद झाला. सरकारने या कंपनीतील आपली 3.5 टक्के भागीदारी विकून 21000 कोटी रुपये मिळवले होते. अँकर इन्व्हेस्टर्सने एलआयसीचे 5.93 कोटी शेअर खरेदी केले होते. कंपनीने 949 रूपयांवर इन्व्हेस्टर्सला शेअर जारी केले होते. अँकर इन्व्हेस्टर्समध्ये जास्त देशांतर्गत फंड्स होते. त्यांना आतापर्यंत 25 टक्केपेक्षा जास्त लॉस झाला आहे.
एलआयसीच्या आयपीओमध्ये देश आणि परदेशातील अँकर इन्व्हेस्टर्सने पैसे लावले होते.
यामध्ये गव्हर्मेंट ऑफ सिंगापूर, एसबीआय म्युच्युअल फंड, एचडीएफसी म्युच्युअल फंड आणि अॅक्सिस म्यूच्युअल फंडचा समावेश होतो.
परंतु, जास्त गुंतवणूक देशांतर्गत म्युच्युअल फंडांनी केली आहे. या इश्युमध्ये म्युच्युअल फंडच्या 99 स्कीममध्ये 4000 कोटी रूपये मूल्याचे शेअर खरेदी केले होते.
या इश्यममध्ये एलआयसीच्या पॉलिसी होल्डर्सने खुपच जास्त रूची दाखवली होती. पॉलिसी होल्डर्सचा कोटा सहापट सबस्क्राईब झाला होता.
याचे कारण डिस्काऊंट होते. कंपनीने आपल्या पॉलिसी होल्डरर्सला प्रति शेअर 60 रूपयांचा डिस्काउंट दिला होता.
रिटेल इन्व्हेस्टर्सला प्रति शेअर 45 रूपयांचा डिस्काऊंट मिळाला होता.
या कारणामुळे रिटेल इन्व्हेस्टर्सने सुद्धा या इश्यूमध्ये चांगली रुची दाखवली होती.
परंतु, कमजोर लिस्टिंगमुळे या आयपीओमध्ये पैसे लावणार्या गुंतवणुकदारांची निराशा झाली होती.
नंतर सातत्याने होणार्या घसरणीने त्यांना हताश केले आहे. त्यांना समजत नाही की, आता काय करावे.
सध्याच्या भावात विकल्यास त्यांना मोठे नुकसान होऊ शकते.
Web Title :- LIC Share Share Price | lic share price falls to rupees 653 it has slumped 32 percent after listing do you own this stock
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Latur Crime | धक्कादायक ! महिलेने 72 वर्षाच्या व्यक्तीसोबत बनवला अश्लिल व्हिडीओ, 15 लाखाचं ‘मॅटर’