Udayanraje Bhosale | ‘हिंमत असेल तर दोघेही ईडीच्या चौकशीला सामोरे जाऊ या’, उदयनराजेंचे अजित पवारांना आव्हान

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि भाजपचे खासदार (BJP MP) उदयनराजे भोसेले (Udayanraje Bhosale) एकमेकांपासून फटकून असतात. अजित पवार उदयनराजे भोसले यांच्यावर फारशी टीका करताना पहायला मिळत नाही. मात्र, अजित पवार यांनी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना उदयनराजे यांच्यावर टीका केली आहे. या टीकेला उदयनराजे (Udayanraje Bhosale) यांनी आपल्या खास शैलीत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

 

मी कुठल्या पक्षाच्या विरोधात बोलत नसून भ्रष्टाचाराच्या (Corruption) विरोधात उघडपणे बोलतो. जे कोण मला खंडणीखोर (Ransom Seeker) बोलतात त्यांनी समोरासमोर यावं. माझ्यात दम आहे, मी ईडीची चौकशी (ED Inquiry) करायला तयार आहे. तुमच्यात दम असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरे जायला तयार रहा, असं आव्हान उदयनराजे भोसले यांनी अजित पवार यांना दिलं आहे. माण तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलतानात अजित पवार यांनी उदयनराजे (Udayanraje Bhosale)  यांच्यावर टीका केली होती. या टिकेला उदयनराजे यांनी प्रत्युत्तर दिले.

उदयनराजे भोसले म्हणाले, तुम्ही त्या काळी साताऱ्याचे प्रतिनिधी होता, मंत्री होता. त्यावेळी तुमची जबाबदारी का नाही पार पाडली? ज्या कंपन्या साताऱ्यातून गेल्या त्यांना जाऊन विचारा मला कशाला विचारता. या कंपन्या साताऱ्यातून बाहेर जाण्यास कोण जबाबदार आहे? असं असताना खंडणी मागतो असा माझ्यावर आरोप केला जात आहे. मी पक्षाला घरचा आहेर दिला असे बलले जाते. मी कुठल्या पक्षाच्या विरोधात बोलत नाही तर भ्रष्टाचाराच्या विरोधात उघडपणे बोलतो. जे कोण मला खंडणीखोर बोलतात त्यांनी समोरासमोर यावं. माझ्यात दम आहे, मी ईडीची चौकशी करायला तयार आहे. तुमच्यात दम असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरं जायला तयार रहा. तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत की लोकलुटारे आहात ते ठरवा, अशा शब्दात त्यांनी अजित पवार यांचे नाव न घेता प्रत्युत्तर दिले.

 

Web Title :- Udayanraje Bhosale | mp udayanraje bhosale if you have courage face ed inquiry udayanraje bhosale challenges ajit pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sangli Crime | तपासासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला, जिल्हा सत्र न्यायालयाकडून 5 महिलांना सक्तमजुरी

 

Udayanraje Bhosale On Ajit Pawar | उदयनराजेंचं अजित पवारांना खुलं आव्हान; म्हणाले – ‘हिंमत असेल तर समोरासमोर या..’

 

Swiggy-Zomato 1 जुलैपासून डिलिव्हर करणार केवळ ‘क्वालिटी फूड’, FSSAI ग्राहकांच्या हितासाठी लागू करत आहे नवीन नियम