LIC ची लय भारी योजना, मुलीच्या नावे १२१ रुपये जमा करा आणि मिळावा तब्बल २७ लाख 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुलींकरिता भारत सरकारकडून अनेक योजना आणल्या जात आहेत. मुलींच्या उज्वला भविष्याकरिता विश्वसार्ह्य विमा कंपनी LIC कडून नवी योजना आणण्यात येणार आहे. या स्कीममधून दररोज १२१ रुपयांची बचत केल्यास २७ लाख रुपये मिळणार आहेत. नक्की काय आहे ही स्कीम जणून  घेऊया

बहुपयोगी कन्यादान योजना
LIC च्या या पॉलिसीअंतर्गत प्रत्येक दिवशी आपल्याला १२१ रुपये जमा करायचे आहेत. त्यानंतर २५ वर्षांनंतर १२१ रुपयांच्या बचतीवर आपल्याला १ नाही २ नाही तर तब्बल २७ लाख रुपये मिळणार आहेत. या स्कीमची विशेष गोष्ट अशी आहे की जर काही करणास्तवर मुदतीपूर्वीच पॉलिसीचे हप्ते भरणाऱ्या मुलीच्या वडिलांचे निधन झाले तरी हप्ते देणे अनिवार्य नसते. पण ही पॉलिसी चालूच राहते. या पॉलिसी अंतर्गत वडिलांच्या मृत्यूनंतर परिवाराला तात्काळ १० लाख रुपये मिळतात. तसेच जर मुलीच्या पित्याचा मृत्यू अपघातात झाला असेल तर मात्र २० लाख रुपयांची रक्कम या पॉलिसीअंतर्गत मिळते.

खरेतर ज्या स्कीमबाबत आपण माहिती घेत आहोत त्याचे नाव ‘कन्यादान’ योजना आहे. या पॉलीसी अंतर्गत मुलीचे शिक्षण आणि इतर खर्चासाठी देखील प्रत्येक वर्षी लग्न होऊपर्यंत १ लाख रुपये मिळतात. तसेच याबरोबर पॉलिसी देखील नियमित चालू राहते.  या पॉलिसीच्या अधिक माहिती करिता आजच तुम्ही  LIC च्या अधिकृत वेबसाईट लाभेल देऊ शकता किंवा LIC एजंट ला संपर्क करू शकता.

काय आहेत या पॉलिसीची वैशिष्ट्ये
–२५ वर्षाच्या पॉलिसीसाठी २२ वर्षांपर्यंत हप्ते द्यावे लागतात.

–दररोज  १२१ रुपये किंवा महिन्याला ३६०० रुपए भरावे लागतात
–पॉलिसीधारकाचा  आकस्मात मृत्यू झाल्यास परिवाराला हप्ते भरण्याची आवश्यकता नसते .
–मुलीला पॉलिसीच्या उर्वरित काळात  प्रत्येक वर्षी मिळणार १ लाख रुपये.
–पॉलिसी पूर्ण झाल्यानंतर नॉमिनीला मिळणार २७ लाख रुपये .
— ही विमा पॉलिसी कमी किंवा जास्त रकमेच्या हप्त्यांमध्ये देखील घेतली जाऊ शकते.