चिमुकल्यांसाठी LIC ची भन्नाट योजना ! शिक्षणासाठी लागणार्‍या पैशाची काळजीच नको, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात ग्राहकाच्या सेवेसाठी असणारी सगळ्यात मोठी कंपनी म्हणजे जीवन विमा महामंडळ (LIC) आहे. तर ही कंपनी विविध नव्या पॉलिसी ग्राहकांसाठी उपलब्ध करत असते. अनेक गरजेनुसार अनेक वेगवेगळ्या नव्या पॉलिसी तयार करत असते. तर अशीच एक नवी आणि योग्य पॉलिसी लहान मुलांसाठी तयार करण्यात आली आहे. न्‍यू चि‍ल्‍ड्रन्‍स मनी बॅक प्‍लान असे या पॉलिसीचे नाव आहे.

या पॉलिसी नुसार पॉलिसीधारकांची मुले १८, २० आणि २२ वर्षाची झाल्यानंतर सम अश्यूर्डची २०-२० % रक्कम मिळेल. बाकी ४० % रक्कम पॉलिसीधारक २५ वर्षाचा झाल्यावर मिळणार आहे. यावेळी पॉलिसीधारकाला बोनस देखील मिळणार आहे. ही पॉलिसी मुलांच्या शिक्षणासाठी अत्यंत फायद्याची ठरू शकते. मुलांच्या महाविद्यालयीन किंवा उच्च शिक्षणावेळी या पॉलिसीतून बेनिफिट मिळते. तर या पॉलिसीमधील महत्वपूर्ण मुद्दे जाणून घ्या.

१. ही पॉलिसी खरेदी करण्यासाठी कमीतकमी वयोमर्यादा ० वर्षे आहे
२. ही विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठी अधिकाधिक वयोमर्यादा १२ वर्षे आहे
३. या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कमीतकमी रक्कम १० हजार रुपये आहे, जास्तीत कोणतीही मर्यादा नाही.
४. प्रीमियम वेवर बेनिफिट राइडर हा पर्याय उपलब्ध आहे

दरम्यान, जीवन विमा महामंडळ (LIC) न्‍यू चि‍ल्‍ड्रन्‍स मनी बॅक प्‍लानची एकूण टर्म २५ वर्षांची आहे. तर पॉलिसीच्या मॅच्यूरिटीवेळी (विमाधारकाचा पॉलिसीच्या कालावधी दरम्यान मृत्यू न झाल्यास) पॉलिसीधारकाला विम्याच्या रकमेची बाकी ४० % बोनस सहित मिळणार आहे. पॉलिसीमधील काळात पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याला अंतिम अतिरिक्त बोनस दिला जाणार आहे. मुखतः एकूण पेमेंटच्या १०५ % Death Benefit मिळणार आहे. मिळतो.