Life Expectancy Decreased | कोरोनाच्या नंतर 2 वर्षांनी कमी झाले लोकांचे वय; स्डीमध्ये झाला आश्चर्यकारक ‘खुलासा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Life Expectancy Decreased | कोरोना महामारीनंतर भारतातील लोकांचे सरासरी वय (Life Expectancy Decreased) दोन वर्ष कमी झाले आहे. ही बाब मुंबईच्या इंटरनॅशनल इन्स्टीट्यूट फॉर पॉप्युलेशन स्टडीज (IIPS) च्या शास्त्रज्ञांनी एक स्टॅटिकल अनालिससच्या आधारावर सांगितली आहे. IIPS नुसार, भारतातील महिला आणि पुरुषांची लाईफ एक्स्पेक्टन्सी 2019 च्या तुलनेत 2 वर्ष कमी झाली आहे.

 

इतक्या वर्षांची झाली लाईफ एक्स्पेक्टन्सी
आयआयपीएस असिस्टंट प्रोफेसर सूर्यकांत यादव यांनी म्हटले की, पुरुषांची लाईफ एक्स्पेक्टन्सी 67.5 वर्ष झाली आहे, ती 2019 मध्ये 69.5 वर्ष होती. तर महिलांची लाईफ एक्स्पेक्टन्सी 72 वर्षांची झाली आहे मागील वर्षी ती 69.8 झाली होती.

 

या स्टडीमध्ये length of life inequality म्हणजे लोकसंख्येत जीवनाच्या कालावधीत विविधतेवर सुद्धा लक्ष देण्यात आले आणि आढळले की, 35-69 वर्षाच्या पुरुषांवर कोविडचा प्रभाव सर्वात जास्त होता.

 

स्टडीमध्ये म्हटले की 35-79 वर्षाच्या लोकांमध्ये सामान्य वर्षांच्या तुलनेत 2020 मध्ये कोविड संसर्गामुळे जास्त मृत्यू झाले आणि 35-69 वयोगटाचा यामध्ये सर्वात मोठा भाग होता.

या वर्षी झाले सर्वात जास्त मृत्यू
IIPS चा हा स्टडी देशात कोरोनाने होणार्‍या मृत्यूदराचा (Covid Deaths) पॅटर्न पाहण्यासाठी कंडक्ट केला गेला होता.
जगभरात कोविड-19 मुळे मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी सर्वात जास्त मृत्यू झाले. (Life Expectancy Decreased)

 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार मार्च 2020 पासून आतापर्यंत कोविड-19 मुळे 4.5 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.
मात्र डेटा एक्सपर्टचे म्हणणे आहे की हा आकडा केवळ 4.5 लाख नाही, तर यापेक्षा कितीतरी जास्त आहे.

 

Web Title :- Life Expectancy Decreased | life expectancy decreased by 2 years after corona shocking revelation in iips study

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 1,781 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Chandrakant Patil | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आधी माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी मारली ‘बाजी’, जाणून घ्या

Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले ब्रिजवर ‘अब तक 56’ ! ‘या’ कारणामुळं ‘सेल्फी पॉईंट’जवळ अपघात होत असल्याचं वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी स्पष्टचं सांगितलं (व्हिडीओ)