Lingayat Samaj | लिंगायत स्वतंत्र धर्म मान्यता मिळेपर्यंत माघार नाही; राष्ट्रीय लिंगायत महाअधिवेशनात एक मुखी घोषणा

बिदर – Lingayat Samaj | कर्नाटक राज्यातील बसवकल्याण (Basavakalyan) येथे जागतिक लिंगायत महासभेचे (Lingayat Mahasabha) मार्च ४ व ५ रोजी राष्ट्रीय लिंगायत महाअधिवेशन संपन्न झाले (Lingayat Maha Adhiveshan At Basavakalyan) . या अधिवेशनास कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगण, आंध्रप्रदेश, केरळ, तामिळनाडू, गोवा, दिल्ली, या शिवाय अनेक देशात असलेले हजारो समाज बांधव उपस्थित होते. विविध राज्यातील २०० हून अधिक धर्मगुरु मठाधिश आले होते. या सर्वांनी लिंगायत स्वतंत्र धर्म मान्यता मिळेपर्यन्त संघर्ष सुरुच ठेवणार, माघार घेणार नाही असा एकमुखी निर्णय जाहिर केला. दि. ०४/०३/२०२३ रोजी परुषकटटा येथून अधिवेशन स्थळापर्यन्त सर्वाध्यक्ष गो. रु. चन्नबसप्पा यांची मिरवणूक काढण्यात आली.

अधिवेशनाचे उदघाटन उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अरळी नागराज यांच्या हस्ते झाले. त्यांनी अलीकडच्या काळात न्याय व्यवस्था ही भारतीय नागरीकांची विश्वासार्हता गमावत असल्याचे दिसत आहे, त्यामुळे न्यायालयाची पायरी न चढता संघर्षातून लिंगायतांनी अल्पसंख्याक दर्जा मिळवून घ्यावा असे म्हटले. सर्वाध्यक्ष गो.रु. चन्नबसप्पा यांनी यांनी लिंगायत हा एक स्वतंत्र धर्म असून तो स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाचा पुरस्कार करतो, लिंगायत समाजाने राष्ट्राच्या जडणघडणीत अमूल्य योगदान दिले आहे, त्यामुळे केंद्र सरकारने आमची मागणी मान्य करुन आम्हांस अल्पसंख्याक दर्जा दयावा असे आवाहन केले. यावेळी ” जगदगल” नावाची स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. (Lingayat Samaj)

उदघाटनानंतर ‘ लिंगायत समाजाचे संघटन, जाती-उपजातींचे एकीकरण आणि आचरण यामध्ये मठाधिश, महिला व युवक यांचे पात्र या विषयी चर्चा कराण्यात आली. या विषयी पूज्यश्री शरच्चंद्र महास्वामी, पूज्यश्री शरणबसव देवरु, पू. गंगाबिका, पू.अन्नपूर्णा, रायचंद्र रवीकुमार, राजशेखर नारीनाळ, विश्वाराध्य सत्यंपेटे, प्रा. भीमराव पाटील यांनी मार्गदर्शन केले. डॉ. एस. एम. जामदार आणि राज्य मागास वर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष सी एस द्वारकानाथ यांनी लिंगायत आणि आरक्षण याविषयी अभ्यासपूर्वक मांडणी करताना लिंगायताना अल्पसंख्याक दर्जा मिळाल्यानंतर त्यांना आज मिळणारे आरक्षण जाणार नाही हे ध्यानात ठेवावे. कांही लोक जाणीवपूर्वकअपप्रचार करुन समाजाची दिशाभूल करीत आहेत. त्यांच्यापासून सावध रहावे असे सांगितले. या अधिवशनात महाराष्ट्रातील माजी खासदार श्री राजू शेटटी हे उपस्थित राहून पुढील काळात लिंगायत स्वतंत्र धर्म मागणीसाठी लोकसभेत आवाज उठवीन असे आश्वासन दिले. (Lingayat Samaj)

या सत्रात जगद्गुरू डॉ. तोंतड सिद्धलिंग महास्वामी, गदग, पूजाश्री डॉ. बसवलिंग पट्टदेवरु आप्पाजी, भालकी, महिला जगदगुरु गंगा माताजी, प्रा. श्री. पंडितराध्य शिवाचार्य महास्वामी, पं. कोरणेश्वर स्वामीजी, उस्तुरी, पी.ओ. सांगनबसवा स्वामीजी, तेलंगा, पू स्वामीनाथ स्वामीजी,सोलापूर उपस्थित होते. समारोप समारंभात सर्वानुमते बारा ठराव घेण्यात आले.

पहिल्या राष्ट्रीय लिंगायत महा अधिवेशनात घेतलेले ठराव

१) हे अधिवेशन सर्वानुमते मंजूर करते आणि ठराव करते की, जागतिक लिंगायत महासभा ही सर्व लिंगायतांची एकमेव प्रातिनिधीक संस्था आहे.

२) लिंगायत धर्माला घटनात्मक मान्यता देण्यासाठी कर्नाटक सरकारने केलेल्या शिफारशीची केंद्र सरकारने अंमलबजावणी करावी, असा निर्णय या अधिवेशनात सर्वानुमते घेण्यात आला.

3) केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारांनी विश्वगुरू बसवण्णांची जयंती साजरी करावी. या संदर्भात जागतिक लिंगायत महासभा प्रथम प्राधान्य स्वीकारते आणि त्याचे मूल्यांकन करते.

4) राष्ट्रीय राजधानीत निर्माण होत असलेल्या नव्या संसद भवनाला “अनुभव मंटप” असे नाव देणे आणि त्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर विश्वगुरु बसवण्णांचा पुतळा बसवणे आणि त्याखाली “जगातील पहिल्या लोकशाहीचे जनक” असे लिहिण्याचा निर्णय घेण्यात आला.

५) बसवकल्याण येथे बांधण्यात येत असलेल्या नवीन अनुभव मंटपाला केंद्र सरकारकडून राष्ट्रीय स्मारक
म्हणून घोषित करण्याचा निर्णय या अधिवेशनात सर्वानुमते घेण्यात आला.

6. हे अधिवेशन एकमताने मंजूर करते की, कर्नाटक सरकारने विश्वगुरु बसवण्णा यांना कर्नाटकचे सांस्कृतिक
नायक म्हणून घोषित करावे असा निर्णय घेतला.

७) लिंगायत मठ अलीकडे वैदिक परंपरेचे पालन करत आहेत. या मठांनी लिंगायत धर्माच्या तत्त्वांनुसार खरे लिंगायत विधी पाळावेत, असा निर्णय या अधिवेशनात एकमताने घेण्यात आला.

8. हे अधिवेशन एकमताने मंजूर करते आणि ठराव करते की जनगणना किंवा इतर कोणतेही सर्वेक्षण
करताना लिंगायतांची नोंद धर्माच्या स्तंभात केली जावी.

9. शरणक्षेत्रांच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी “शरण क्षेत्र विकास प्राधिकरण” स्थापन करावे
आणि शरणक्षेत्रांच्या विकासादरम्यान जागतिक लिंगायत महासभेच्या इच्छेनुसार विकास कामे हाती घ्यावीत
यावर अधिवेशनात एकमत झाले.

10. देशातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठ अभ्यासक्रमात शरण साहित्य समाविष्ट करावे असा
सर्वानुमते ठराव घेण्यात आला.

11. बसव कल्याण येथे नवीन अनुभव मंटपाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर, अधिवेशनाने एकमताने मान्यता
दिली की, तिथे शरण सिद्धांताचा प्रसार करणारे “वचन विद्यापीठ” स्थापन केले जावे.

12. बसवकल्याणातील परुष कट्टा यांच्याशी लिंगायतांचे भावनिक नाते आहे.
त्याचे जागतिक दर्जाच्या स्मारकात रूपांतर होणे गरजेचे असून त्यासाठी परुषकट्टा परिसरात नवीन इमारती
बांधण्यास परवानगी देऊ नये व त्यासाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात,
असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

Web Title : Lingayat Samaj | No retreat until Lingayat independent religion is recognized; Lingayat Maha Adhiveshan At Basavakalyan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Khamgaon Jalna Railway Line Project | खामगाव-जालना रेल्वे प्रकल्पासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींसमवेत बैठक घेणार – मंत्री दादाजी भुसे

Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | छत्रपती संभाजी महाराजांचा ‘स्वराज्यरक्षक’ असा उल्लेख केल्याबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले सरकारचे अभिनंदन

Maharashtra Politics | ’50 खोक्के आणि नागालँड ओक्के’वरुन विधानसभेत गोंधळ, मुख्यमंत्र्यांची सभागृहात डायलॉगबाजी

Ajit Pawar | शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते अजित पवार सभागृहात आक्रमक