LinkedIn चे 70 कोटी यूजर्स अडचणीत, डार्क वेबवर विकले जातेय फोन नंबर; अ‍ॅड्रेस आणि सॅलरीशी संबंधीत माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था (Policenama online) – LinkedIn यूजर्सने यावर्षी दुसर्‍यांदा मोठ्या प्रमाणात डेटा उल्लंघनाचा अनुभव घेतला आहे. एका नवीन ब्रीचमध्ये लिंक्डइनच्या 70 कोटीपेक्षा जास्त यूजर्सचा डेटा लीक (Users data leaked) झाला आहे. रिपोर्टनुसार, या ब्रीचमध्ये LinkedIn यूजर्सच्या पर्सनल डिटेल्स जसे की फोन नंबर, अ‍ॅड्रेस, जिओलोकेशन डेटा (Phone number, address, Geolocation data) आणि सॅलरीशी संबंधीत माहितीचा समावेश आहे. या सर्व डिटेल्स आता डार्क वेबवर विक्रीसाठी तयार आहेत.

रिपोर्टनुसार, LinkedIn च्या 92 टक्के यूजर्सचा डेटा ब्रीच झाला आहे. या ब्रीचशी संबंधीत माहिती जेव्हा समोर आली तेव्हा एका लोकप्रीय हॅकर फोरमच्या वापरकर्त्याने 22 जूनला 700 मिलियन लिंक्डइन वापरकर्त्यांच्या डेटासाठी एक जाहीरात प्रसिद्ध केली. ज्या हॅकरने (Hacker) हा डेटा काढला आहे त्याने सॅम्पल म्हणून 1 मिलियन रकॉर्डसुद्धा पोस्ट केले आहेत.

अलिकडच्या एका रिपोर्टने दुजारो दिला आहे की, हॅकरने जमवलेला डेटा प्रत्यक्ष आणि अप-टू-डेट (Up-to-date) आहे. रिपोर्टमध्ये पुढे उल्लेख केला आहे की, ब्रीच झालेल्या डेटामध्ये वापरकर्त्यांची नावे, ईमेल आयडी, फोन नंबर, अ‍ॅड्रेसशी संबंधीत सर्व रेकॉर्ड आहे. हॅकरने लिंक्डइन एपीआयचा फायदा घेत डेटा जमवला आहे.

दरम्यान, लिंक्डइनने डेटा ब्रीचचे प्रकरण नाकारले असून म्हटले की,
हा लिंक्डइन डेटा ब्रीच नव्हता. आमच्या तपासणीत आढळले की,
कोणत्याही वैयक्तीक लिंक्डइन मेंबरचा डेटा लिक झालेला नाही.
आम्ही सतत यावर काम करत आहोत की, यूजर्सच्या प्रायव्हसीचे नुकसान होऊ नये.

Web Title :-  linkedin 700 million users data leak personal data including mobile number address and salary details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

नगरमध्ये महापौर, उपमहापौर निवडीपूर्वीच शिवसेनेत ‘राडा’ ! दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी

भारत बायोटेकला मोठा ‘झटका’ ! भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे ब्राझिलने केला ‘कोव्हॅक्सिन’चा 324 मिलियन डॉलरचा करार रद्द

Pune Crime News | बुधवार पेठेतील ‘त्या’ महिलेच्या खुनाचा पर्दाफाश; सत्य आलं समोर

Corona side effects | कोरोना संसर्गाचा आणखी एक साईड इफेक्ट ! आता शौचातून ब्लिडिंगची 5 प्रकरणे आली समोर, एकाचा मृत्यू